Home आपला मेळघाट हरिहर नगरात महिला फाशीवर लटकली , मृतदेह आमदार व महिला पत्रकाराने उचलले

हरिहर नगरात महिला फाशीवर लटकली , मृतदेह आमदार व महिला पत्रकाराने उचलले

2829
0

धारणी प्रजामंच,13/11/2020
धारणी शहरातील प्रतिष्ठित कॉलनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरिहर नगरातील खारवे टाऊनशिप मध्ये राहणाऱ्या एका शिक्षकाच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्रथम दर्शनी समोर आले असून हि घटना १२ नोव्हेंबर गुरुवारी संध्याकाळी ५ वाजता दरम्यान घडली असून शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता घटना उजेडात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, शासकीय आश्रम शाळा सुसर्दा येथे शिक्षक या पदावर कार्यरत असलेले संजय माणिकराव बहादुरे वय ४९ वर्षे यांच्या पत्नी सुचिता बहादुरे वय ३३ वर्षे हिने खार्वे टाऊनशिप मध्ये आपल्या राहत्या घरी गुरुवारी संध्याकाळी ५ वाजता दरम्यान गळफास घेऊन स्वतःला संपविले. हि घटना कालपासून घडली असली तरी संजय बहादूरे यांनी घटनेची माहिती कोणाला हि न देता आपल्या दोन अपत्यांसह समोरील हॉलमध्ये रात्र काढूने पसंद केले पण बेडरूमचे दार उघड्याची तत्परता दाखविली नाही. दुसऱ्या दिवशी लहान मुलांनी आईसाठी टाहो फोडल्याने कोठेतरी धारणी पोलीस ठाण्याला या घटनेची कल्पना देण्यात आली, तेव्हा घटनास्थळी सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेतन कदम यांनी भेट दिली, पंचनामा सहाय्य्क पोलीस निरीक्षक श्रीमती मोरे, जमादार दामोदर जावरकर,पोलीस कॉन्स्टेबल बाबुलाल कासदेकर यांनी करून आपले कर्तव्य पार पडले. गुरुवारी बहादुरे दाम्पत्याचे दिवसभर भांडण झाल्याची चर्चा असून अद्यापही आत्महत्येची गूढ रहस्य कायम आहे.
मृतक सुचिता बहादुरे यांचे मृतदेह उचलण्यास कोणीही धाडस करीत नसल्याने मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल व प्रजामंच संपादिका दुर्गाताई बिसंदरे यांनी मृतदेह उचलले, सोबतच पोलीस शिपाई यांनी साथ दिली. आपल्या आमदारकीचा कोणताही अभिमान न दाखवता आमदार राजकुमार पटेल हे सामान्य नागरिकांची भूमिका पार पाडतात ही बाब उल्लेखनीय असून सामान्य जनतेसाठी आदर्श देणारी आहे.