Home अमरावती शेठजी म्हणाल तोच सरपंच, दिया ग्राम पंचायत मध्ये परंपरा कायम!

शेठजी म्हणाल तोच सरपंच, दिया ग्राम पंचायत मध्ये परंपरा कायम!

1594
0

धारणी प्रजामंच,१७/०२/२०२१
धारणी तालुक्यातील सर्वाधिक मोठी असणारी दिया ग्राम पंचायत मध्ये पुन्हा आम्ही अशी जयघोष करणाऱ्यांसाठी आता विरोधक बळकट असल्याचे चित्र स्पष्ट असून शेठजी म्हणाल तोच सरपंच, हि पंरपरा आजही कायम असल्याचे चित्र समोर आले असले तरी नुकत्याच नवनिर्वाचित महिला सरपंच निशा भिलावेकर हया शिक्षित असल्याने शेठजी बोलले तेच होईल हि परंपरा कायम राहणार की, याला पूर्णविराम लागणार! हे सध्या तरी सांगणे अवघड आहे मात्र मागील १५ वर्षांपासून झालेली विकास कामांची दशा अति दयनीय असून काही महिन्यात काँक्रेट रस्ते खड्यात रूपांतरित झाल्याचे चित्र कायम आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे सरपंच जो कोणी असला तरी त्याची नाथाची दोरी शेठजीच्या हातात राहते. दिया ग्राम पंचायत मध्ये ग्राम पंचायत सदस्य काना खालचा असावा याची विशेष दक्षता घेतली जाते आणि तसेच लोक निवडून आणून शेठजी म्हणाल तोच सरपंच, हि परंपरा कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. आपल्या घरी नौकरी करणारा किंवा त्याचा नातेवाईक आदींना ग्राम पंचायत सदस्यांसाठी विशेष प्राधान्य दिले जाते.१३ सदस्यीय दिया ग्राम पंचायतच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सरपंच पदी निशा शोभराम भिलावेकर तर उपसरपंच पदी सावित्री सुरेश जैस्वाल यांनी प्रत्येकी ८ मते मिळवून विजयी मिळविले आहे.
१५ वर्षानंतर हि शेठजी म्हणाल तो सरपंच ती दिया ग्राम पंचायत आजही अनेक मूलभूत सुविधापासून वंचित आहे हे विशेष.