Home अमरावती धारणी उपजिल्हा रुग्णालयातील अधीक्षक पद बनले संगीत खुर्ची

धारणी उपजिल्हा रुग्णालयातील अधीक्षक पद बनले संगीत खुर्ची

203
0

माता-बाळ मृत्यू सत्र कायम

अमरावती (धारणी) प्रजामंच विशेष,9/10/2020

अनेक वर्षांपासून वैद्यकीय सुविधेसाठी तहानलेल्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाटला उत्तम आरोग्य सुविधा कधी मिळणार हा प्रश्न कायम असून ज्या आरोग्य सुविधा आहेत त्यामध्ये राजकारणाची सावली पडल्याने आता काही डॉक्टरांमध्ये अप्रत्येक्ष राजकारण संचारल्याचे लक्षात येते. मलईदार अधीक्षकाची खुर्ची मिळविण्यासाठी राजकीय रान उठल्याचे दिसून येते. त्यामुळे धारणी रुग्णालयातील अधीक्षकाच्या खुर्चीला संगीत खुर्ची स्पर्धेचे स्वरूप आले असून वरिष्ठांनी याकडे कानाडोळा केल्याचे लक्षात येते, यामुळे  इतर चांगल्या होतकरू डॉक्टरांच्या कामावर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. राजकीय शक्ती प्रदर्शनाच्या नादात माता-बाल मृत्यू कायम आहे.

अट्रॉसिटी व अधीक्षकाच्या खुर्चीचे निकट संबंध

उपजिल्हा रुग्णालयातील अधीक्षकाचा प्रभार असणारे डॉक्टर स्त्री रोग तज्ज्ञ अमोल नालट यांच्यावर दोन वेळा अट्रॉसिटी सारखा गंभीर गुन्हा दाखल होणे, म्हणजे या अधीक्षकाच्या खुर्चीशी संबंध असण्याची शक्यता नाकारता येत नाही, डॉक्टर सारख्या बुद्धिवान व्यक्तीला अट्रॉसिटी गुन्ह्याची गंभीरता कळत नसेल असे समजणे योग्य होणार नाही, सध्या हा भाग न्यायालयीन असल्याने यावर बोलता येणार नाही, मात्र या प्रकरणामुळे माता-बाळ मृत्यू झालेत हि बाब गंभीर आहे. मात्र याकडे गंभीरता कोणीही दाखवत नसल्याचे चित्र आहे.

समाज क्रांती आघाडीचे हस्तक्षेप म्हणजे मेळघाटात जातीवादाला खतपाणी घालणे

धारणी उपजिल्हा रुग्णालयात सुरु असलेल्या राजकीय संघर्षात समाज क्रांती आघाडीने उडी घेतल्याचे लक्षात येते, डॉक्टर नालट यांच्यावर अट्रॉसिटी  गुन्हा दाखल करण्याची मागणी पासून अटक करण्यासाठी शक्ती पणाला लावली पण रुग्णालयात होणाऱ्या मृत्यूवर गप्प राहणे योग्य समजले, दुसरीकडे  अधीक्षकाचा प्रभार डॉक्टर दयाराम जावरकर यांना देण्याची मागणी करीत जावरकर हे आदिवासी समाजाचे आहेत त्यामुळे त्यांना अधीक्षकाचा प्रभार द्यावा असा उल्लेख करून मागणी केल्याने मेळघाटात जातीय तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे, डॉक्टर सारख्या पवित्र पेंश्याला जातीत वाटण्याचा हा प्रकार असून यामुळे संविधानाच्या उद्देश्यावरच हल्ला करण्याचा प्रयत्न आहे, या मेळघाटात विविध जाती धर्माचे डॉक्टर काम करीत आहे ते कोणाला जात विचारून उपचार करीत नाही, तर डॉक्टर कडे फक्त मानव हि एकच जात असते, अश्या परिस्थितीत समाज क्रांती आघाडी संघटना जातीयता पसरविण्याचा प्रयत्न का करीत आहे कळत नाही,

कोणाला प्रभार द्यायचा हा प्रशासनाचा अधिकार

धारणी उपजिल्हा रुग्णालयातील अधीक्षकाचा प्रभार कोणाला द्यायचा यासाठी संबंधित विभागाचे प्रशासकीय विभाग सक्षम असतांना त्या विभागावर प्रभार याच व्यक्तीला द्या असा दबाव टाकणे म्हणजे एक प्रकारे प्रशासकीय कामात अडथळा आणणे असा होतो, लोकशाही अभिव्यक्ती आवश्य आहे, अभिव्यक्ती आहे म्हणून काहीही करणे व बोलणे योग्य नाही.

मलईदार पद म्हणून डोळा

आदिवासी व अतिदुर्गम भागात मोठ्या प्रमाणात निधी शासनस्तरावरून येते, मोफत औषध पुरवठा हा सर्व बजेट कोटयावधी मध्ये जातो म्हणून अधीक्षकाची खुर्ची हि आदिवासी क्षेत्रात मलाईदार झाली आहे. म्हणून त्यावर विराजमान होणे म्हणजे कुबेराशी मैत्री करणे असा होतो.

जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या दूरध्वनी बंद किंवा  मिटिंगला त्यामुळे संपर्क झाला नाही.