Home अमरावती मेळघाटात राणा दाम्पात्याकडून होळीचा अपमान, आमदार राजकुमार पटेल ने केला निषेध

मेळघाटात राणा दाम्पात्याकडून होळीचा अपमान, आमदार राजकुमार पटेल ने केला निषेध

3608
0

राजकीय वातावरण चमकविण्यासाठी होळीला चपलेचा हार टाकून चपलेने मारले
धारणी प्रजामंच विशेष,२९/३/२०२१
मेळघाटातील आदिवासींचा पवित्र मानल्या जाणाऱ्या होळी या सणाचा संविधानिक पदावर विराजमान राणा दाम्पत्यांकडून अपमान झाला असून मास्क न लावता सामाजिक अंतराचे पालन न करता जमावबंदी नियमाचे उल्लंघन केल्याची घटना घडली असली तरी प्रशासकीय यंत्रणाने याची कोणतीही दखल न घेतल्याने आदिवासी जनतेमध्ये खेद व्यक्त केला जात आहे.
होळी हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा सण मानला जातो, या सणाचे विशेष महत्व असून पूजा केली जाते,तर मेळघाटात आदिवासी समाजात होळी या सणाला सर्वाधिक महत्वाचे मानतात, मात्र खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी हरिसाल येथे होळीला चपलांचा हार घालून युवा स्वाभिमान महिला तालुका अध्यक्ष वर्षा जैस्वाल होळीला चपलाने मारत असल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे, ही घटना धर्माला अपमानित करणारी असून आदिवासीच्या मनाला ठेस पोहचविणारी आहे, रवी राणा हे आमदार तर त्यांच्या पत्नी नवनीत राणा खासदार आहेत, आपण जनतेचे प्रतिनिधित्व करीत असताना सभागृहात समस्या मांडण्यासाठी जनतेने निवडून दिले आहे मात्र राजकीय प्रसिद्धी मिळविण्यासाठी धर्माचा अपमान करण्याचा प्रकार राणा दांपत्याकडून करण्यात आला आहे. खरोखर दिपाली चव्हाण यांच्या विषयी एवढी आत्मीयता होती तर खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांना दिपाली चव्हाण वर अन्याय होत आहे याची माहिती पाच महिना अगोदर होती. मग त्यांनी सभागृहात हा विषय का मांडला नाही जनतेने प्रतिनिधित्व समस्या मांडण्यासाठी दिले आहे धर्माचे अपमान करण्यासाठी नाही.
रेड्डी आणि शिवकुमार यांचा निषेध नोंदवायचा होता तर होळीच्या बाहेर हा सर्व प्रकार करणे अपेक्षित होते पण तसे न केल्याने होळीचा अपमान झाला असून या घटनेमुळे मेळघाटातील आदिवासीच्या मनाला दुखापत पोहोचल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. आता राणा दाम्पत्यावर गुन्हा दाखल होतो का हे बघणे सामान्य जनतेसाठी मजेशीर होणार असून कायदा हा गरीबासाठीच आहे का असा प्रश्न पुन्हा जिवंत होईल.

होळीला चपलेने मारून अपमानित केल्याने आदिवासीच्या भावना दुखावल्या आहेत, आपले राजकारण चमकविण्यासाठी खासदार, आमदार पदावर विराजमान राणा दाम्पत्य आदिवासींचा अपमान करीत असेल तर याचा तीव्र विरोध करून निषेध नोंदवितो.
             आमदार राजकुमार पटेल
              मेळघाट विधान सभा