Home राजकीय शेतकरी, कामगार, सुशिक्षित बेरोजगारांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी बोलावे: राजू शेट्टी

शेतकरी, कामगार, सुशिक्षित बेरोजगारांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी बोलावे: राजू शेट्टी

798
0

राज्यात जनअक्रोश यात्रा काढण्याचा दिला इशारा

राज्यात शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार युवक यांचे प्रश्न कायम आहेत. गत निवडणूकीआधी साखर कारखान्यांतील आर्थिक घोटाळे व सिंचन घोटाळे करणांच्या विरोधातील गाडीभर पुरावे तुम्ही तत्कालीन मुख्यमंत्र्यांना दिले होते. त्यांनी काहीच कारवाई केली नाही, त्यात तुमचे सरकार आल्यास त्या सर्वांना तुम्ही तुरुंगात टाकणार होता, त्या ऐवजी धोरणात बदल करून त्यातील बहुसंख्यांना भाजपात प्रवेश देऊन उरलेल्यांना इनकम टॅक्स व ईडी या आपल्या दोन कार्यकर्त्यांची भिती दाखवून त्यांना भेदरलेल्या अवस्थेत ठेवणे हे राज्याच्या प्रगतीच्या दृष्टीने आवश्यक बाब आहे. हे जनतेला पटवून सांगणार आहात काय? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. सामान्य जनतेच्या प्रश्नांची उत्तरे ते देत नसतील तर त्यांच्या महाजनादेश यात्रेपाठोपाठ राज्यात जनआक्रोश यात्रा काढणार असल्याचेही शेट्टी यांनी म्हटले आहे.

राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खालील मुद्यांकडे लक्ष वेधले आहे-

1)राज्यातील बिल्डराकडून वसूल केलेल्या 10 हजार कोटींच्या ठेवी बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे जमा झाल्या. त्यातील तुम्ही किती पैसे खर्च केले? आणि त्यामधूून कुणाचे कल्याण झाले. अजूनही बांधकाम कामगार किड्या मुंग्यांसाारखे मरत आहेत. त्यासाठी तुमच्या सरकारने काय केले?

2) पीक विम्यामध्ये झालेल्या गैरव्यवहाराबद्दल मी स्वत: दीड वर्षापुर्वी पुराव्यासहित माहिती आपल्याकडे दिलेले होते. संबधित विमा कंपनी व त्या कंपनीस सहकार्य करणाऱ्या कृषि व महसूल विभागातील भ्रष्ट अधिर्का­यांवर काय कारवाई केली, व असे शेतर्क­यांचे पुन्हा नुकसान होऊ नये म्हणून काय दक्षता घेतली. आयआरडीए (इश्युरन्स रेग्युलेटरी अ­ॅण्ड डेपलपमेंट अ­ॅथोरटी) कडे किती शेतर्क­यांनी तक्रारी केल्या व त्याचे पुढे काय झाले, याचा मुख्यमंत्री या नात्याने तुम्ही आढावा घेतला काय?

3) आपले विश्वासू सहकारी श्री. पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखील महाराष्ट्र कृषि मूल्य आयोगाने उसाचा उत्पादन खर्च मागील वर्षाच्या (सन 2016-17)तुलनेत 32 हजाराने कमी असल्याचा अहवाल केंद्र सरकारकडे दिलेला आहे. ते ऊस उत्पादक शेतर्क­यांना सांगणार काय ? तसेच मंत्री मंडळातील आपले सहकारी ना. सुभाष देशमुख, ना. तानाजी सावंत, ना. पंकजाताई मुंडे, ना. राधाकृष्ण विखे पाटील, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, यांनी ऊस उत्पादकांचे पैसे थकविले असले तरीसुध्दा फारसे मनावर घेऊ नका असे ऊस उत्पादकांना सांगणार आहात का?

4) आपले सरकारमधील कर्तृत्वान कृषी खात्याने बोंड अळी पासून कापूस कसा वाचवावा याचा कानमंत्र शेतर्क­यांना दिलेला नसला तरी बोंड अळी पासून बचाव करण्यासाठी शेतर्क­यांनी एसटीबीटी बियाण्यांचा वापर केल्यास ते पुरवर्ण्या­या कंपन्यांवर कारवाई न करता मोदी सरकारच्या आदेशावरून शेतर्क­यांनाच तुरूंगात टाकले जाईल, कुणाची गय केली जाणार नाही असा सज्जड दम कापूस उत्पादकांना देणार आहात का?

5) तूर, हरभरा, मगू उडीद कांद्याचे अनुदान ठिबकचे अनुदान इत्यादीसाठी अनुदान मिळाले नाही, तरीही तक्रार करू नका, साल्याओ…! असे सांगणार आहात काय? तसेच कर्जमाफीच्या यादी नाव असले तरीसुध्दा थकीत कर्जापोटी बँकानी कर्जवसुली केली अथवा नवीन कर्ज दिले नाही तरीही शेतर्क­यांनी तक्रार करू नये, कारण सरकार आता झिरो बजेट शेतीचा पुरस्कार करत असल्याने आता कुणीही तक्रार करू नये, असे सांगणार आहात का?

6) पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना साखर कारखान्यांतील आर्थिक घोटाळे व सिंचन घोटाळे करर्णा­यांच्या विरोधातील गाडीभर पुरावे तुम्ही तत्कालीन मुख्यमंर्त्यांना दिले होते. त्यांनी काहीच कारवाई केली नाही, त्यात तुमचे सरकार आल्यास त्या सर्वांना तुम्ही तुरुंगात टाकणार होता, त्या ऐवजी धोरणात बदल करून त्यातील बहुसंख्यांना भाजपात प्रवेश देऊन उरलेल्यांना इनकम टॅक्स व ईडी या आपल्या दोन कार्यकर्त्यांची भिती दाखवून त्यांना भेदरलेल्या अवस्थेत ठेवणे हे राज्याच्या प्रगतीच्या दृष्टीने आवश्यक बाब आहे. हे जनतेला पटवून सांगणार आहात काय?

7) धनगर समाजाने एस.टी. दाखला मिळावा म्हणून बारामतीला उपोषण केले होते. आपण स्वत: बारामतीला जाऊन सरकार बदलल्यास पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर सामाजाला एसटीचे दाखले देण्याचा निर्णय घेऊ असे आश्वासन देऊन उपोषण सोडवले व आता आचारसंहिता एक महिन्यात लागणार असल्यामुळे धनगरांना एस.टी. चे सर्व लाभ व तरतूद केलेले 1000 कोटी रूपये सर्व खर्च करून दाखवू हे पटवून देणार आहात का?

8) लिंगायत धर्मातील बहुसंख्य जातींना उदा(परिट, कुंभार, गुरव, जंगम, लोहार, सुतार, माळी, कोष्टी, वाणी इ.) ओबीसीचा आदिंना लाभ मिळत असताना पाटील, देशमुख यासारख्या वतनदार लिंगायत धर्मातील लोकांना ओबीसीचे आरक्षण देणे शक्य नाही, हे माहित असताना लिंगायत समाजास ओबीसीच्या सवलती देऊ, असे खोटे आश्वासन देऊन त्यांच्या स्वतंत्र धर्माच्या मागणीस भाजपा पाठिंबा देणार नाही, असे ठासून सांगणार आहात काय?

9) महाराष्ट्रातील सुशिक्षीत बेरोजगारांवर रोजगार देण्यासाठी 35 लाख पदांची मेगाभरती करून सुशिक्षीत बेरोजगारांचे प्रश्न कायमस्वरूपी मिटवणार होता, पण सुशिक्षित बेरोजगारांनी अर्जच न केल्यामुळे ही मेगाभरती करता आली नाही, हे बेरोजगारांना पटवून देणार आहात का?

10) राज्य सरकारने तात्पुरत्या स्वरूपामध्ये प्रशासकीय कामांमध्ये आऊटसोर्सिंग द्वारे रोजदांरी (कंत्राटी) पध्दतीने नोर्क­या दिलेल्या आहेत. त्या कंत्राटदारांना दिली जाणारी शासनाकडून रक्कम व प्रत्यक्षात हातात पडणारी रक्कम यात जमीन आस्मनाचे अतंर असले तरी तुम्हाला दिलेल्या नोर्क­या उपकार समजा व मुकाट्याने सहन करा असे डाटा ऑपरेटर, महावितरणाचे वायरमन, ड्रायव्हर, सफाई कामगार, इत्यादींना समजावून सांगणार आहात काय?

11) गेल्या 4 वर्षापासून कृषि वीज पंपाच्या जोडण्या दिलेल्या नाहीत, तसेच महावितरण कंपनीचा भ्रष्टाचार लपविण्यासाठी शेतर्क­यांनी विजेचा वापर न करताही त्यांच्या नावावर टाकलेली बिले दुरूस्त करून देतो असे वारंवार आश्वासन देऊनही तसेच 1 रूपया 16 पैसे युनिट विजेचे दर निश्चित करण्याचा शासन निर्णय करूनही 2 रूपये 50 पैसे पैक्षा जास्त दराने वीज बिलांची आकारणी करून शेतर्क­यांना लुबाडण्याचे धोरण योग्यच आहे, हे शेतर्क­यांना ठासून सांगणार आहात काय?