Home अमरावती मेळघाटात महिला सबलीकरणासाठी लघु उद्योग आवश्यक-दुर्गाताई बिसंदरे

मेळघाटात महिला सबलीकरणासाठी लघु उद्योग आवश्यक-दुर्गाताई बिसंदरे

248
0

परतवाडा प्रजामंच, 6/2/2021

राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला बळकट करण्यासाठी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रम अंतर्गत मेळघाट व अचलपूर या दोन्ही विधानसभाची आढावा बैठक अचलपूर येथे यावेळी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, महिला प्रदेश अध्यक्ष रुपालीताई चाकणकर, अमरावती जिल्हा अध्यक्ष सुनील वऱहाडे, महिला जिल्हा संगीताताई ठाकरे, आदी मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी मेळघाट विधान सभेत महिलांच्या अडचणी व समस्याविषयी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देतांना धारणी महिला राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष दुर्गा बिसंदरे यांनी मेळघाटात नियमित रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी लघु उद्योग उभारण्याची गरज असल्याचे मत मांडले सोबतच महिला बचत गटांना आर्थिक मदतीसह महिलांना लघु उद्योग विषयी आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात यावे. ग्रामीण क्षेत्रातील काही महिलांना महाराष्ट्र रोजगार हमीचे काम उपलब्ध होते. मात्र शहर विभागातील महिला यापासूनही वंचित राहतात, धारणी शहरात राहणाऱ्या महिलांना रोजगार मिळत नाही, त्यामुळे  आर्थिक स्थिती नाजूक होवून कुपोषणाला मदत मिळते, सोबतच रोजगारसाठी भटकावे लागते. मेळघाटचा रोजगार हा महत्त्वाचा मुद्दा असून त्यासाठी उपाय योजना करणे गरजेचे असल्याचे दुर्गाताई बिसंदरे यांनी यावेळी सागितले.