Home आपला मेळघाट मालवीय दाम्पत्य सामाजिक कार्यामुळेच सरपंच व उपसरपंच पदावर विराजमान

मालवीय दाम्पत्य सामाजिक कार्यामुळेच सरपंच व उपसरपंच पदावर विराजमान

812
0

धारणी प्रजामंच,२१/०२/२०२१
अमरावती जिल्ह्यात असलेल्या धारणी तालुक्यातील ११ सदस्य असणाऱ्या धारणमहू ग्राम पंचायतमध्ये आपल्याच पॅनलचे सर्व सदस्य निवडून आणण्याचा किर्तीमान आपल्या नावाने करीत पत्नी सरपंच व पती उपसरपंच या पदावर विराजमान होऊन नवीन इतिहास रचण्याचे सौभाग्य मालवीय दाम्पत्याला लाभले असून याला त्यांच्या कडून करण्यात येणारे सामाजिक कार्य कारणीभूत असल्याचे गावकऱयांकडून माहिती मिळाली.
ग्राम पंचायत धारणमहूच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सरपंच या पदावर रामप्यारी मालवीय तर उपसरपंच राजकुमार मालवीय पदी बिनविरोध निवड झाली आहे. सरपंच रामप्यारी राजकुमार मालवीय हया ग्राम पंचायत मध्ये तिसऱ्यांदा निवडून आल्या असून सरपंच पदावर दुसऱ्यांदा विराजमान झाल्या आहेत. मालवीय दाम्पत्य सतत सामाजिक कार्य मध्ये व्यस्त असतात, गोरगरिबांच्या अडचणीत सहकार्य करून त्यांच्या समस्यां सोडविण्याचे काम करीत असल्याने लोकप्रियता वाढली, जनतेची सेवा करीत गावाचा विकास करण्याचा ध्येय मालवीय दाम्पत्याचा असल्याची माहिती मिळाली आहे.