Home राजकीय मुख्यमंत्र्यांच्या “महाजनादेश” यात्रेत कार्यकर्ते मात्र अस्वस्थ

मुख्यमंत्र्यांच्या “महाजनादेश” यात्रेत कार्यकर्ते मात्र अस्वस्थ

938
0

आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विविध राजकीय पक्षांनी आपली तयारी सुरू केली आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या यात्राही निघत आहेत. यामध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांनी गुरुवारपासून काढलेल्या महाजनादेश यात्रेची चर्चा सध्या सुरू आहे. या यात्रेमध्ये त्यांच्याकडून जनादेशाची मागणी होत असताना सर्वसामान्यांच्या प्रश्नांपेक्षा राजकीय प्रश्नांवर आणि घडामोडींवर फोकस होत असल्याचे दिसून येत आहे. मूळ स्वतंत्र विदर्भाचा प्रश्‍न असो विदर्भातील शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचा प्रश्न असो व दुष्काळाचा प्रश्न असो यावर गांभीर्याने चर्चा होताना दिसत नाही. या महाजनादेश यात्रेत इन्कमिंग-आऊटगोईंग यावरच भर असल्याचा दिसत आहे. बाहेरील पक्षातील नेत्यांना हाउसफुलचा बोर्ड दाखवत असताना गेल्या महिन्यात दोन महिन्यांच्या घडामोडी काढल्या अनेकांना पक्ष प्रवेश देण्यात आला. त्यासंदर्भात फारशी चर्चा होताना दिसत नाही. पक्षाचे सर्वसामान्य कार्यकर्ते पक्षाच्या भूमिकेवर कुठेतरी प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

पक्ष वाढवण्यासाठी आणि सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी ज्या लोकांनी अनेक वर्ष संघटन बांधण्याचं काम केलं, त्या लोकांना सत्तेत आल्यानंतर जे इन्कमिंग पाहायला मिळते. त्यामुळे कुठेतरी सतरंज्या आपल्याला उचलावं लागणार का? असा प्रश्न मनात येत आहे. आतापर्यंत ज्यांच्याविरुद्ध लढलो त्याच लोकांचा प्रचार येणार्‍या निवडणुकीत करावा लागणार का? याबाबत ही चर्चा सुरू झाली आहे. हे निष्ठावंत कार्यकर्ते भाजपाला मनापासून मदत करणार की या इन्कमिंगच्या प्रकारामुळे पक्षाच्या विरोधात जाऊन पक्षालाच हानी होईल असे काम करणार का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.