Home अमरावती कावळाझिरीच्या जंगलात मोठ्या प्रमाणात सागाची झाडे नष्ट होण्याच्या अवस्थेत

कावळाझिरीच्या जंगलात मोठ्या प्रमाणात सागाची झाडे नष्ट होण्याच्या अवस्थेत

472
0

वन विभागाला बसणार लाखोंचा फटका, वनरक्षक महादेव खोऱ्यात मस्त
धारणी प्रजामंच विशेष,3/08/2020
सध्या वन विभाग व अथवा व्याघ्र प्रकल्प वन कर्मचारी पाळीव प्राणी जंगलात आले की मोठा नुकसान होतो असा देखावा करून मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वृक्ष कटाई पासून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष भडकविण्याचा हा सुनियोजित प्रकार असल्याचे लक्षात येते, मुख्य कर्तव्याची विसर पडलेले कर्मचारी वनाचे रक्षक करणार तरी कसे असा सवाल आता वन प्रेमी कडून उपस्थित केला जात आहे.
धारणी तालुक्यातील सुसर्दा वन परिक्षेत्रात येणाऱ्या कावळाझीरीच्या महादेव मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मोठं मोठ्या झाडांना कुऱ्हाडीने कापून घेर मारण्यात आले आहे, तर काही झाडे नष्ट करण्याचा प्रकार हि दिसून आला, तर काही ठिकाणी सागाचे झाड कापून कुंपण सुद्धा करण्यात आल्याचे विदारक चित्र बघायला मिळाले, यामुळे मोठ्या सागाच्या झाडांचे नुकसान होणार असून लाखोंच्या वन संपत्तीचा नुकसान वन विभागाला होण्याची शक्यता नाकारता येत नाही, मात्र याकडे संबंधित वनरक्षकाचे दुर्लक्ष का असा सहज सवाल उपस्थित होत असून वनरक्षकाचे इतर कोठे तार जुडल्या तर नाही ना असा हि प्रश्न निर्माण होतो. कावळाझिरी च्या वन क्षेत्रात खुल्या आणि डोळ्याने दिसणाऱ्या भागात एवढे वृक्ष कटाई आहेत तर जंगलाच्या आत काय परिस्थिती असेल हा मोठा मंथनीय विषय आहे, वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष कधी घालतील हे हि तेवढेच महत्त्वाचे आहे.
वनरक्षक महादेव मंदिरात असतो पार्टीत दंग
विशेष सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कावळाझिरी येथील वन कर्मचारी महादेव मंदिरात येऊन भोजन पार्टीमध्ये दंग राहत असल्याची हि माहिती समोर येते. जंगलात अश्या भोजन पार्ट्या वन अधिनियमांबाहेर असतांना मात्र वनरक्षकच नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे चित्र आहे. वनाचे रक्षण सोडून इतर कामात वनरक्षकाने लक्ष केंद्रित केल्याने अश्या वनरक्षकाकडून नुकसान भरपाईसह कडक कार्यवाही व्हावी अशी मागणी आता वन प्रेमींकडून होत आहे.