Home अकोला मेळघाटात कार्यरत कांत्राटी परिचारिकांना स्पर्धा परीक्षा विना नियमित करण्याची मागणी

मेळघाटात कार्यरत कांत्राटी परिचारिकांना स्पर्धा परीक्षा विना नियमित करण्याची मागणी

548
0

तब्बल १५ वर्षांपासून सेवा देत असल्याने वयोमर्यादा बाहेर होण्याच्या मार्गावर
अमरावती,प्रजामंच,३०/०८/२०२१
मेळघाटसारख्या अतिदुर्गम भागात आरोग्य सेवा देणाऱ्या ११३ कांत्राटी परिचारिकांना कोणत्याही स्पर्धा परीक्षा न घेता सरसकट नियमित सेवेत सामावून घेण्यात यावे असे निवेदन संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांना मेळघाट कंत्राटी परिचारिका कृती समितीने धारणी महिला राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष दुर्गाताई बिसंदरे यांच्या नेतृत्वात नागपूर दौरा दरम्यान निवेदन दिले, मागील १५ वर्षापासून तर आज पर्यत अति अल्प मानधनावर आरोग्य सेवा देत आहे, दीड वर्षापासून सुरु असलेल्या कोविड-१९ सारख्या जागतिक महामारीत सुध्दा आरोग्य सेवा देण्याचे काम थांबले नाही, या महामारीच्या काळात २४ तास सज्ज राहून आरोग्य सेवा देण्याचे काम सुरु आहे. अश्या बिकट परिस्थितीत शासनाच्या कामात अडथळा येवू दिले नाहीत त्यामुळे कोणत्याही प्रकारची स्पर्धा न घेता परिचारिका या पदावर नियमित करण्यासाठी मागील १५ वर्षापासून सेवा देता असल्याने बहुतेक कंत्राटी परिचारिकांचे नोकरीतीलवयोमर्यादा संपण्याच्या मार्गावर आहे, कोविड-१९ मध्ये काही काळ सेवा देणाऱ्या परिचारिकांना नियमित करण्याचे शासन निर्णय घेते मात्र आम्ही मागील १५ वर्षापासून सेवा देत आहे, कोविड-१९ महामारीच्या काळात २४ तास सेवा दिली आहे, त्यामुळे आम्ही कंत्राटी परिचारिकांना नियमित सेवेत सामावून करण्यात यावे. सतत मेळघाट सारख्या भागात दोन-दोन प्रभार सांभाळून आरोग्य सेवा देत असतांना स्पर्धा परीक्षेची तयारी करणे शक्य नाही, कोणीही मेळघाटात येण्यास तयार नसतांना कंत्राटी परिचारिकांनी विविध भूमिका धारण करीत आरोग्य सेवा देवून शासनाची बाजू सांभाळण्याचे काम केले आहे. मेळघाटात कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या सर्व जातीच्या परिचारिकांना सेवेत नियमित करण्यात यावे.यापूर्वी वन कर्मचारी हजेरी सहाय्यक, सर्व शिक्षा अभियानांतर्गत नियुक्त विषय शिक्षक व इतर विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत या अगोदर शासनाकडून सामावून घेण्यात आलेले आहे. या मुद्यांचा आधार घेऊन नियमित सेवेत सामावून घेण्याचा उल्लेख निवेदनात केले आई. मेळघाटात काम करणारया कंत्राटी सी. एच. ओ व नियमित परिचारिकेला अनुक्रमे पंधरा हजार रुपये व दहा हजार रुपये प्रसूती प्रोत्साहन भत्ता म्हणून दिला जातो, त्याच एन आर एच एम व्दारे कंत्राटी सी. एच. ओ आणि कांत्राटी परिचारिकांची नियुक्ती असताना या प्रसूती प्रोत्साहन भत्तापासून कांत्राटी परिचारिकांना डावलण्यात आले आहे, प्रसूती करण्याचे मुख्य कार्य कांत्राटी परिचारिका करतात हा अन्याय दूर करून प्रसूती प्रोत्साहन भत्ता कंत्राटी परिचारिकांना सुध्दा देण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी मेळघाट कंत्राटी परिचारिका कृती समिती अध्यक्ष कविता कुहेकर,सचिव जीवनमाला वानखडे व आदी उपस्थित होत्या.