धारणी प्रजामंच,२०/०२/२०२१
महाराष्ट्राचे दैवत मानले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा धारणीत अजूनही उभारण्यात आला नसल्याने मागील काही वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात यावा यासाठी जनतेची मागणी होत आहे, त्या मागणीला अनुसरून धारणी येथील संत गजानन महाराज मंदिर परिसरात मराठा सेवा संघाच्या वतीने शिव जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून संबोधित करतांना मेळघाट विधान सभेचे आमदार राजकुमार पटेल म्हणाले की, धारणी शहरात लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येईल, पुढील वर्षी तेथेच शिव जयंती साजरी करता येईल असा ध्यास ठेवून प्रयत्न सुरु आहे. जगाला गनिमी कावासह कणखर लढण्याची धडे देणारे शिवराय आपल्या महाराष्ट्राच्या मातीत जन्मले हे आपले मोठे सौभाग्य असल्याचे हि म्हटले,
यावेळी मंचावर उपसरपंच ऋषिकेश गाडगे, ग्राम पंचायत सदस्य सौ. दुर्गाताई बिसंदरे, संदीप गावंडे, शिवसेना तालुका अध्यक्ष राजू उर्फ शेलेंद्र मालवीय, उपस्थित होते, कार्यक्रमाचे प्रास्तविक प्राध्यापक नितीन देशमुख यांनी केले तर संचालन राहुल सोनोने यांनी केले, या सोबतच युंगाधर सोनोने, पंकज माकोडे, काँग्रेस युवा जिल्हाध्यक्ष पंकज मोरे, माजी नगरसेवक विनोद वानखडे, पंकज लायदे छोटू देशमुख, दिलीप गावंडे, कडू, आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम आयोजनास मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्यानी विशेष श्रम घेतले.