Home अमरावती ग्राम पंचायत निवडणुकीत मतदान केंद्रावर उमेदवाराची दबंगिरी चतुर्थ कर्मचारी जखमी

ग्राम पंचायत निवडणुकीत मतदान केंद्रावर उमेदवाराची दबंगिरी चतुर्थ कर्मचारी जखमी

1919
0

धारणी प्रजामंच,१५/०१/२०२१
धारणी तालुक्यात ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२१ साठी १५ जानेवारी २०२१ ला मतदानाची वेळ संपल्यावर मतदान केंद्रात दुचाकीवर एका महिला मतदात्याला बसवून बळजबरीने एका उमेदवाराने प्रवेश व्दारला धडक दिल्याने मतदान पथकातील चतुर्थ कर्मचारी जखमी झाला असून एक मोठा अनर्थ होता होता टाळला. अश्या परिस्थितीत सुध्दा काही राजकीय व्यक्तीकडून दबंगिरी करणाऱ्या उमेदवाराला वाचविण्याचा प्रयत्न सुरु झाला होता, मात्र पोलीस विभागाने सावधगिरीची भूमिका घेत सध्या तरी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिया ग्राम पंचायत मधील तलाई कॅम्प वार्ड क्रमांक ४ मध्ये ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकी करिता १५ जानेवारीला मतदान केंद्रावर सकाळ पासूनच दारू, पैसा वाटप करून एक उमेदवार गोंधळ घालीत असल्याची तक्रार धारणी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेतन कदम यांना करण्यात आली , त्यानुसार सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेतन कदम यांनी चोख बंदोबस्त करून आखलेल्या सीमा रेषेच्या आत न येण्याची ताकीद दिली, त्यानंतर होणारा गोंधळ आटोक्यात आला.
तलाई कॅम्प वार्ड क्रमांक ४ मधून निवडणूक लढविणारे उमेदवार कपिल जैस्वाल यांनी मदतीसाठी दिया, हरदोली, खापरखेडा, धारणी आदी ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात लोकांना बोलावून मतदात्यांची मने वळविण्यासाठी दारू व पैसा वाटप करण्याचा गैर प्रकार केल्याचा आरोप करण्यात येत आहे. मतदानाची वेळ संपल्यावर समोरील गेट चतुर्थ कर्मचारी बंद करीत असताना एक महिला मतदात्याला नियमांचे उल्लंघन करीत कपिल जैस्वाल याने दुचाकीवर बसवून बळजबरीने मतदान केंद्रात नेण्यासाठी गेटला धडक दिल्याने चतुर्थ कर्मचाऱ्याच्या डोक्याला मार लागून जखमी झाल्याची घटना ५. ३० वाजता घडली.
घटना स्थळी पुन्हा सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेतन कदम पोहचले दबंगिरी करणाऱ्या उमेवाराला ताब्यात घेतल्याची माहिती मिळते.
सकाळी सहाय्यक पोलीस अधीक्षक यांनी गोंधळ न घालण्याची ताकीद दिल्यानंतर हि कपिल जैस्वाल व त्याने बाहेर गावावरून बोलावलेल्या लोकांचा गोंधळ करण्याचा प्रकार लपून छपून सुरूच होता. अखेर तो प्रकार मतदान केंद्राच्या गेटला धडक देऊन समोर आला. आता निवडणूक विभाग व पोलीस प्रशासन काय कार्यवाही करते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.