Home आपला मेळघाट अवैध गोवंशाच्या वाहतुकीवर धारणी पोलिसाची चपराक, ८ आरोपीसह पाच गाड्या जप्त

अवैध गोवंशाच्या वाहतुकीवर धारणी पोलिसाची चपराक, ८ आरोपीसह पाच गाड्या जप्त

922
0

धारणी प्रजामंच,29/11/2020
धारणी पोलिसांना गोपनीय सूत्राकडून ढाकणा मार्गे बोलेरो गाडीने अवैध रित्या गोवंश वाहून नेत असल्याची माहिती मिळाली, त्यानुसार तात्काळ सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा धारणी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथक नेमून सापळा रचून ढाकणा-अकोट टी पॉईंट वर नाकाबंदी करण्यात आली, पाचही बोलेरो गाड्या थांबविल्यावर मिळालेली माहिती सत्य आढळून आली, पाचही गाड्यामध्ये गोवंश कोंबून भरल्याची प्रत्यक्ष पोलीस पथकाच्या निदर्शनात आल्याने पाचही बोलेरो ताब्यात घेऊन धारणी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले. सोबत ८ आरोपींना अटक करण्यात आले असून गोवंश जातीचे २४ बैलासह २३ लाख ६० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गोवंशाची वाहतूक कत्तली करिता करण्यात येत असल्याचे सर्व परिस्थिती बघता समोर आले आहे हि कार्यावाही रविवारी पहाटे ५ वाजता दरम्यान करण्यात आली आहे. आरोपींविरूध्द भादंवि कलम २७९,३४ सह कलम ११ (१) (डी) (इ ) (i) प्राण्यांना निर्दयतेने वागण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९६० सह कलम ५ (अ) (१) (२) महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम सुधारित २०१५, सह कलम ११९ महाराष्ट्र पोलीस अधिनियम ११३/१९४ मोटार वाहन कायदा या नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा धारणी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी निकेतन कदम यांची हि सर्वात जलद व मोठी कार्यावाही असल्याची चर्चा आता जनतेत होत आहे.