Home आपला मेळघाट आग पीडित व्यापारांना राज्य शासनाकडून सहकार्य मिळावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील –...

आग पीडित व्यापारांना राज्य शासनाकडून सहकार्य मिळावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील – संगीता ठाकरे

484
0

धारणी प्रजामंच २२ नोव्हेबर २०२०
धारणी येथे शुक्रवारी पहाटे दरम्यान लागलेल्या आगीत ३३ दुकाने आगीत जाळून राख झाल्याने कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा अंदाज लावण्यात आला असून ३३ व्यापारांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून आज त्याना मदतीची आवश्यकता आहे, दरम्यान अमरावती राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हा अध्यक्ष संगीता ठाकरे, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल ठाकरे यांनी धारणी येथे आग पीडित व्यापाऱयांची प्रत्यक्ष भेट घेतली, यावेळी संगीता ठाकरे यांनी आग पीडित व्यापाऱ्यांना राज्य शासनाकडून आर्थिक सहकार्य मिळविण्यासाठी थेट पुनर्वसन मंत्रीशी चर्चा करणार असल्याचे सांगितले, घटना अतिशय दुर्दैवी असून प्रशासनाने आग लागण्याचे कारण कोणते याचे शोध घ्यावे, यासाठी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे हि सांगितले.राष्ट्रवादी पक्ष पीडितांना न्याय मिळवून देणारा पक्ष आहे, खोट्या नौटंकी करणारा नाही. यावेळी विधानसभा अध्यक्ष हुकूमचंद मालवीय, तालुका अध्यक्ष श्रीराम पटेल, महिला तालुका अध्यक्ष दुर्गाताई बिसंदरे, शहर अध्यक्ष जावेद सौदागर, शेख शकील (जग्गू ), फइम टेल्को, यांच्यासह बहुसंख्य राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकारी होते.
आग हेतुपुरस्पर लावली
धारणी येथील सर्व्ह क्रमांक १२६ मध्ये असलेल्या व्यापाऱ्यांच्या दुकानाला लागलेली ही आग कोणतीही शॉर्ट सरकीटमुळे लागली नसून हेतुपुरस्पर लावण्यात आल्याचा आरोप काही व्यावसायिकांकडून करण्यात आला.
शेकडो कार्यकर्त्यांचा यावेळी राष्ट्रवादीत प्रवेश
महिला अध्यक्ष संगीताताई ठाकरे यांच्या या धारणी दौरा दरम्यान धारणी महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने भव्य आगमन प्रीत्यर्थ स्वागत करण्यात आले, यावेळी स्वरचना दिनेश मालवीय यांनी राष्ट्रवादीत पक्षात प्रवेश घेतला सोबतच शेकडो कार्यकर्तासह शेख शकील शेख बशीर उर्फ जग्गू भाई यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये प्रवेश घेतला. शेख शकील शेख बशीर उर्फ जग्गू भाई हे या अगोदर शिव सेनेत होते, मात्र त्यांनी आता सेनेला राम राम ठोकून राष्ट्रवादीचे दामन धरले, हे विशेष.