Home आपला मेळघाट दिया ग्राम पंचायत मध्ये प्रशासकाची दबंगगिरी वीट भट्यासाठी धर्माळा ?

दिया ग्राम पंचायत मध्ये प्रशासकाची दबंगगिरी वीट भट्यासाठी धर्माळा ?

518
0

धारणी प्रजामंच,21/2/2021
अमरावती जिल्ह्यात येणाऱ्या धारणी तालुक्यातील दिया ग्राम पंचायत मध्ये राजकीय मक्तेदारीचा बळी पडणे काही नवीन नाही, त्यासाठी अधिकारी सर्व नियम धाब्यावर ठेवून निकृष्ट दर्जाचे विकास कामे करीत असल्याचे हे पहिले प्रकरण नसून याला आळा कधी बसेल, हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
नुकतीच दिया ग्राम पंचायतची निवडणूक पार पडली यामध्ये काही दबंग उमेदवार निवडून आल्याचे कळल्यावरच दिया ग्राम पंचायतला नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकाने नवीन सरपंच बसण्या आधीच निकृष्ट दर्जाच्या रेती व इतर साहित्यसह गुरांसाठी पाण्याचा धर्माळा बांधण्याची घाई केली असल्याने कुंपणच शेत खात असल्याचा प्रकार समोर आला आहे. पाण्याचा धर्माळा बांधणे अति आवश्यक मध्ये येत नसताना ते बांधणे योग्य समजले मात्र आवश्यक असणाऱ्या पाण्याच्या सुविधा सुरळीत करण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. यावरून असे स्पष्ट दिसते कि, जिथे जास्त बचत ते काम करणे हा प्रकार दिया ग्राम पंचायत मध्ये दिसत असून भविष्यात अनेक काळे कारनामे ग्राम पंचायतीची उघडीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही. गुरांसाठी पाण्याचा धर्माळा हा विषय सार्वजनिक असून संपूर्ण ग्राम पंचायत सदस्य कमेटी बसल्यावर करणे अपेक्षित असतांना स्वार्था पोटी गुरांचा धर्माळा बांधून लागून असलेल्या वीट भट्टीच्या मालकाला याचा फायदा व्हावा हा मुख्य उददेश असल्याचे उघडे डोळ्याने गरीब जनतेला दिसत असून अशी चर्चा होत आहे मात्र सामान्य जनता खुलेआम विरोध घेत नाही हे विशेष.

सध्या धर्माळा कोठे व त्याची आवश्यकता किती याची पाहणी करून बांधण्यात यावे असे गटविकास अधिकरी, अभियंता, ग्राम विकास अधिकरी यांना दूरध्वनी वरून सांगितले होते. त्यांनी काम बंद करण्यात आल्याचे सांगितले तरी काम चालू असेल तर हि बाब गंभीर असून यामध्ये सर्वांची भागीदारी असल्याची शक्यता नाकारता येत नाही. लवकरच दिया ग्राम पंचायत मध्ये सुरु असलेल्या भोंगळ कारभार विषयी अमरावती जि. प. मुख्य कार्यकारी अधिकरी यांच्याशी चर्चा करणार आहे.
            दुर्गाताई प्र. बिसंदरे
        नवनिर्वाचित ग्रा. स. सदस्य