Home अमरावती दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण:सोशल मिडीयावर खासदार नवनीत राणाच्या राजीनाम्याची मागणी तर राष्ट्रवादी...

दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण:सोशल मिडीयावर खासदार नवनीत राणाच्या राजीनाम्याची मागणी तर राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसचा राणावर हल्लाबोल

1385
0

आत्महत्या नंतर प्रसिद्धी व श्रेयासाठी चढाओढ
अमरावती (धारणी) २८/०३/२०२१
अमरावती जिल्ह्यातील प्रसिध्द असणारे मेळघाट व्याघ्र प्रकल्पामधील गुगामल वन्यजीव विभागात येणारया हरिसाल वन परिक्षेत्रातील महिला वन परिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली असून राजकीय पक्ष दोषीवर कार्यवाही करण्याची मागणी करीत प्रसिद्धी व श्रेय लाटण्याचा स्पर्धेत सामील झाले आहे. मृत्यू नंतर हाहाकार मात्र जिवंतपणी कोणीही विचारत नाही,ही प्रथा नवीन नाही,
दिपाली चव्हाण एक महिला अधिकारी असताना वन विभागासारख्या खडतर विभागात काम करून आपली ओळख कायम करण्यात मागे राहिली नाही अश्या महिला अधिकाऱ्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सहकार्य होण्यापेक्षा त्रासच देण्याचे काम झाल्याचे समोर आले आहे.
आत्महत्ये अगोदर दिपाली चव्हाण यांनी अप्पर मुख्य वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक रेड्डी यांच्या नावे पत्र लिहून उपवनसंरक्षक शिवकुमार खूप त्रास देत असल्याचा उल्लेखित करीत याविषयी वारंवार तक्रार करून ही न्याय न मिळाल्याने अमरावती लोकसभाच्या खासदार नवनीत राणा यांच्याकडे आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचे कथन करून न्याय मिळविण्याची पाच महिने वाट बघितली. पाच महिने उलटल्यावर सुध्दा न्याय न मिळाल्याने आपण आत्महत्या करीत असल्याचा एकंदरीत अर्थबोध होतो. शासन-प्रशासन कोणीही आपल्या समस्याला घेवून गंभीर नाही यामुळेच दिपाली चव्हाण आत्महत्येस प्रवृत्त झाल्याचे लक्षात येते,
खासदार नवनीत राणा यांनी राजीनाम द्यावा- सोशल मिडीया
फेसबुक, ट्विटर आदी ठिकाणी जेव्हा दिपाली चव्हाण यांचे पत्र प्रसारित झाले तेव्हापासून सोशल मिडीयावर खासदार नवनीत राणा यांनी राजीनामा द्यावा. आपण महिला असून एका महिला अधिकाऱ्याला वाचवू शकल्या नाहीत म्हणून खासदार ताईनी राजीनामा द्या. अश्या पोस्ट व्हायरल होत आहे.
खासदार नवनीत राणा वर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून हल्लाबोल
राष्ट्रवादी कॉंग्रेस राज्य महिला अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांनी खासदार नवनीत राणावर टीका करताना सांगितले की, पाच महिन्या अगोदर हे सर्व प्रकरण माहित होते तर उचलून धरणे अपेक्षित होते, दिपाली चव्हाण यांनी सर्व प्रकरण सविस्तर सांगितल्याचे पत्रात उल्लेख आहे,असे असताना मात्र खासदार राज्यातील बहुमतात असलेल्या सरकार ऐवजी राष्ट्रपती शासन लावण्याची मागणी लोकसभेत मांडत आहे यापेक्षा मोठे दुर्दैव नाही, दुसरीकडे अमरावती जिल्ह्याच्या महिला राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष संगीता ठाकरे यांनी धारणी ठाण्याला प्रत्येक्ष भेट देवून महिला अत्याचार संबधित गुन्हे दाखल करण्याची मागणी करीत दिपाली चव्हाण यांनी खासदार नवनीत राणा यांना आपल्या पिडा सांगून पुरावा म्हणून रेकॉर्डिंग सुध्दा ऐकण्यास दिली तरी ही खासदारांनी चव्हाणाच्या प्रकरणाला गांभीर्याने न घेणे लज्जास्पद असल्याची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यावेळी महिला तालुकाध्यक्ष दुर्गाताई बिसंदरे, विधानसभा अध्यक्ष हुकूमचंद मालवीय, गजेंद्र कस्तुरे, दीपक नागले, आदी उपस्थित होते.
महिला खासदार या नात्याने नवनीतताई राणा यांनी दिपाली चव्हाण यांच्या प्रकरणाला गांभीर्याने घेणे अपेक्षित होते पण ते न घेतल्याने अनेक प्रश्न निर्माण होतात, छोट्या छोट्या बाबी खासदारच्या लगेच वृत्तपत्रात, सोशल मिडीयात प्रसारित होतात मात्र हि गोष्ट का प्रसार माध्यामांच्या समोर खासदार नवनीतताई राणा यांनी आणली नाही हि गोष्ट अजूनही अनुउत्तरीत आहे.