Home आपला मेळघाट धारणी तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती महेंद्र गैलावर धडकले जिल्हाधिकारी कार्यालयात,...

धारणी तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती महेंद्र गैलावर धडकले जिल्हाधिकारी कार्यालयात, तर यावर भाजपचा पलटवार

303
0

अमरावती प्रजामंच,८/१०/२०२०
मेळघाटातील खरीप हंगामातील धान्य ज्वारी, मका, सोयाबीन व इतर धान्यांची खरेदी तत्काळ सुरु करावी अशी मागणी करणारे निवेदन घेऊन धारणी तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तथा जि. प. सदस्य महेंद्र गैलावर अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले असून शेतकऱ्यांची लूट तत्काळ थांबावी, आदिवासी शेतकऱयांचा मका ९०० ते १००० रुपयात खरेदी करण्याचा प्रकार सुरु असून शासकीय हमी भावाने मक्याची खरेदी करण्यात यावी, असा उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे मेळघाटातील शेतकऱयांना न्याय मिळण्याची शक्यता वाढली आहे कारण सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व जिल्हा परिषद सदस्य दोन पद गैलावर यांच्या कडे असून सध्या महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष सत्तेत असल्याने या निवेदनाला विशेष महत्त्व मिळाले आहे. यावेळी राष्ट्रीय काँग्रेस युवा जिल्हा अध्यक्ष पंकज मोरे, सोहनलाल कासदेकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

धारणी भाजप शहर अध्यक्ष सुशील गुप्ता यांनी जि.प. सदस्य महेंद्र गैलावर यांच्या मागणीला शुध्द राजकारण करीत असल्याचा आरोप करीत महाराष्ट्रात सत्ता त्यांची आहे एक फोन जरी कृषी मंत्र्याला केला तर प्रश्न सुटायला पाहिजे, धारणी कृषी उत्पन्न बाजार समिती कॉग्रेसच्या ताब्यात असून महेंद्र गैलवार सभापती आहेत त्यांनीच परवाना दिलेले खाजगी व्यापारी शेतकऱ्यांची लूट करीत आहे, शेतकऱ्यांचा माल हमी भावात खरेदी करून त्याची सुरक्षितेची जबाबदारी कृषी उत्पन्न बाजार समितीने घ्यावी. या सर्व कामासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीला कमिशन मिळते त्या कमिशन मध्ये शेतकऱ्यांना सुविधा देणे अपेक्षित आहे मात्र तसे कोठेच होत नाही मग कमिशनची रक्कम जाते तरी कोठे ? असा सवाल विरोधकांकडून करण्यात आला आहे.