धारणी प्रजामंच २८/११/२०२०
अमरावती जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षा संगीताताई ठाकरे व जिल्हा कार्याध्यक्ष अनिल ठाकरे यांच्या धारणी दौरा दरम्यान आग पीडित व्यापाऱ्यांची भेट घेतल्यानंतर सतत प्रसार माध्यमात प्रमुख स्थान घेऊन झळकत असलेल्या धारणी उपजिल्हा रुग्णालयाला अचानक भेट दिली, भेटी दरम्यान उपजिल्हा रुग्णालयाची पोलखोल झाली, डॉक्टरांच्या उपस्थितीसह रुग्णालयात स्वच्छतेचा अभाव दिसून आला, सोबतच काही लोकांनी उपचारात हलगर्जी होत असल्याची तक्रार सुद्धा यावेळी केली. प्रभारी अधीक्षक डॉक्टर धनंजय पाटील वेळेवर उपस्थित होऊन आपल्या गैरहजर डॉक्टरांचा पक्ष मांडीत बचाव करण्याचा प्रयत्न केला, मात्र अस्वच्छेते विषयी ते शक्य झाले नाही. अगदी वार्डासमोर असलेल्या पिण्याच्या पाणीजवळ मोठ्या प्रमाणात अन्न फेकले होते, तसेच त्यावर वापर होऊन वार्डात ती घाण परत जात होती, शव विच्छेदन गृहासमोर वाहत असलेले घाण पाणी, हे सर्व लपवता आले नाही, मात्र सक्त ताकीद देत संगीताताई ठाकरे यांनी या सर्व बाबतीत सुधारणा व्हावी असे सांगितले, अन्यथा राज्य शासनाकडे आपली तक्रार करणार असल्याचे सांगितले, सतत विविध कारणामुळे धारणी उपजिल्हा रुग्णालयाने चर्चेचे उच्चांक गाठले होते, विशेष बाब म्हणजे अधीक्षकाच्या खुर्ची साठी स्पर्धा लागली होती, भेटीच्या वेळी धारणी महिला राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दुर्गाताई बिसंदरे सोबत होत्या, यावेळी आपल्या रुग्णालयाच्या काही अडचणी प्रभारी अधीक्षक डॉक्टर धनंजय पाटील यांनी मांडल्या,त्या सर्व लिखित स्वरूपात रीतसर पाठविण्याचे संगीताताई ठाकरे यांनी सांगितले, त्याचा पाठपुरावा करून सोडविण्याचे सांगितले.