Home अमरावती धारणी वन वर्तुळात लाखोचा भ्रष्ट्राचार?,खोटे गुन्हे दाखल करून दबाव आणण्याचा कट कारस्थान

धारणी वन वर्तुळात लाखोचा भ्रष्ट्राचार?,खोटे गुन्हे दाखल करून दबाव आणण्याचा कट कारस्थान

1168
0

अधिकाऱ्याच्या वानर उडीने सर्व माहिती गुलदस्त्यात
धारणी प्रजामंच विशेष,२१/०४/२०२१
मेळघाट प्रादेशिक वन विभाग परतवाडा अंतर्गत येणाऱ्या धारणी वन परिक्षेत्रातील धारणी वर्तुळात वन विभागाव्दरे करण्यात येणाऱ्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार झाल्याची धक्कादायक माहिती असून एका सामाजिक कार्यकर्त्याने या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या नातेवाईकांना खोट्या आरोपाखाली फसविल्याची नामुसकी सबंधित वन अधिकाऱ्यांकडून करण्यात आल्याचा आरोप होत असून आता मेळघाटात अधिकारी आपले भ्रष्टाचार लपविण्यासाठी शासकीय कामात अडथळा आणणे या कलमाचा वापर बचाव ढाल म्हणून करीत असल्याचा भास होत आहे.
प्राप्त माहितीनुसार, धारणी वन वर्तुळ अंतर्गत येणाऱ्या खाऱ्या टेब्रू या बीट मध्ये झालेल्या वन विभागाच्या विविध कामांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याची शंका एका सामाजिक कार्यकर्त्याला लागली त्याने याला वाचा फोडण्याचा निराधार केला.सामाजिक कार्यकर्ता माहितीच्या अधिकारात सर्व माहिती मागील दोन वर्षापासून मागत आहे, मात्र अधिकाऱ्याच्या वानर उडीने सर्व माहिती व भ्रष्टाचार अजूनही गुलदस्त्यात आहे. विशेष बाब म्हणजे मनरेगाची कामे वगळून माहिती मागीतली आहे. नियमाप्रमाणे प्रत्येक गाव स्तरावर संयुक्त वन व्यवस्थापन समिती स्थापन करणे, अपेक्षित आहे पण खाऱ्या टेब्रू या गावात मागील दोन वर्षापासून आजपर्यंत समिती गठीत करण्यात आली नसून ज्या गावात वन अधिकारी व वनरक्षकाच्या कानाखालाच्या वन समित्या आहे. त्या गावातील समितीच्या खात्यावर निधी टाकून विविध विकास कामांच्या नावावर भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोप माहिती मागणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याचा आहे. कामाच्या मस्टरमध्ये बोगस नावे टाकून लाखोचा भ्रष्टाचार झाल्याचा दुर्गध येत आहे. एकाच कुटुंबातील अनेक व्यक्तीची नावे, वयस्क व विद्यार्थी आदी लोकांचा समावेश असल्यामुळे माहिती मागितली मात्र वन विभागाने माहिती देणे टाळल्याचे समोर आले आहे, भ्रष्टाचाराचा हा गोरख धंदा मागील दोन ते अडीच वर्षापासून सुरु आहे.असे असताना वरिष्ठांकडून दखल घेण्यात आली नसल्याचे चित्र आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आदेशाला वर्तुळ अधिकारी चव्हाण कडून केराची टोपली
सामाजिक कार्यकर्त्याने वन परिक्षेत्र अधिकारी माहिती देत नाही म्हणून मेळघाट प्रादेशिक वन विभाग परतवाडा हे कार्यालय गाठले तेथून माहिती देण्याचा आदेश आला मात्र वन वर्तुळ अधिकारी जी. एस. चव्हाण याने खाऱ्या टेब्रू येथे वन समितीच गठीत नाही असे सांगत माहिती देण्या पासून पळ काढला व वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आदेशाला केराची टोपली दाखवली.
नातेवाइकांवर खोटे आरोप करून खोटे गुन्हे दखल करण्याचा कट कारस्थान
धारणी वर्तुळ अधिकारी यांनी खाऱ्या टेब्रू येथील एका स्थानिक वन मजुराला हाताशी घेवून माहिती मागणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याच्या नातेवाइकांना खोट्या आरोपाखाली फसवून दबाव आणण्याचा प्रयत्न सुरु केला असून धारणी वन वर्तुळाचा जो कोणी भ्रष्टाचार उघडीस आणण्याचा प्रयत्न करेल त्याला शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोपाखाली जेल मध्ये पाठवू जेणे करून कोणी माहिती मागणार नाही, हा वापरण्यात येत असल्याचा आरोप गावातील नागरिक करीत आहे.