Home अमरावती चुनखडी आरोग्य केंद्रात कालबाहय औषधासह, उंदिरांचा सुळसुळाट, सी.एच.ओ. बेपत्ता

चुनखडी आरोग्य केंद्रात कालबाहय औषधासह, उंदिरांचा सुळसुळाट, सी.एच.ओ. बेपत्ता

889
0

चिखलदरा प्रजामंच,प्रशांत पंडोले,24/02/2021 

अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यात येणाऱ्या अतिदुर्गम क्षेत्रात असलेले चुनखडी येथील आरोग्य उपकेंद्रात कालबाहय औषधाचा साठा आढळून आले असून डॉक्टरच्या टेबलातील कपाटाला उंदरांनी आपले निवासस्थान बनविल्याचा लज्जास्पद प्रकार उघडीस आले आहे, ही बाब मेळघाटातील आरोग्य यंत्रणेसाठी दुर्दैवी असून वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

माहिती प्रमाणे, रुग्ण कल्याण समिती सदस्य तथा पंचायत समिती सदस्या प्रतिभाताई कंगाले व वैद्यकीय अधिकारी यांच्या संयुक्त भेटी दरम्यान चुनखडी आरोग्य उपकेंद्राला भेट दिली असता केंद्रीय आरोग्य अधिकारी डॉ. सुनील पंडित मागील एक महिन्यापासून बेपत्ता असल्याचे निदर्शनात आले असून त्याच्या टेबलाच्या कपाटात उंदीराने वास्तव केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे,यामुळे पुन्हा एकदा वाद ग्रस्त असणारे चुनखडी उपकेंद्र प्रकाशझोतात आले आहे. औषध साठ्याची पाहणी केली असता २०२० या वर्षातील औषध अजून साठवून ठेवण्यात आले आहे. हेच औषध रुग्णांना देण्यात येत असावा असा संशय निर्माण झाला आहे, या सोबतच खडीमाल येथील प्रसूतीगृहाची दारे खिडक्या तुटल्याने येथे अस्वच्छता पसरली असून प्रसूतीसाठी आवश्यक उपकरण व साहित्य उपलब्ध नसल्याचे आढळून आले तर कुत्र्यानी प्रसूतीगृहाला आपले निवासगृह बनविल्याचे चित्र दिसून आले. एकीकडे कोरोनामुळे स्वच्छतेवर अधिक भर देण्याची सक्ती शासनाकडून होत असतांना मात्र चुनखडी,खडीमाल येथे आरोग्य केंद्रात अस्वच्छता तांडव करतांना दिसत आहे. या सर्व प्रकारला बघून रुग्ण कल्याण समिती सदस्य तथा पंचायत समिती सदस्या प्रतिभाताई कंगाले यांनी नाराजी व्यक्त करीत संबंधित डॉक्टर, आरोग्य कर्मचारीवर तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली असून डॉक्टर सुनील पंडित हे एक व दोन महिना पर्यत वारंवार गैरहजर राहत असल्याचे खडीमाल येथील सरपंच तुलसी कास्देकर यांनी सांगून नाराजी व्यक्त केली. या भेटी दरम्यान कंत्राटी आरोग्य सेविका खडीमाल येथे हजर होत्या.