Home आपला मेळघाट धारणी येथे कास्ट्राईब शिक्षक संघटनेची आढावा सभा रा.ना. गावंडे यांच्या उपस्थितीत संपन्न.

धारणी येथे कास्ट्राईब शिक्षक संघटनेची आढावा सभा रा.ना. गावंडे यांच्या उपस्थितीत संपन्न.

147
0

प्राथमिक शिक्षकांवरील अन्याय सहन करणार नाही- रा.ना. गावंडे
धारणी प्रजामंच ११/९/२०२१
धारणी येथे कास्ट्राईब शिक्षक संघटनेची आढावा सभा विभागीय प्रसिद्धी प्रमुख रा.ना. गावंडे यांच्या उपस्थितीत पार पडली. या सभेत मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते. टाळेबंदीच्या काळात मेळघाट मध्ये सर्व शिक्षक इमान इतभारे प्रामाणिक सेवा दिली व सध्या हि देत आहे, मात्र तरी हि विनाकारण सेवारत शिक्षकांना त्रास दिल्यास अन्याय सहन करणार नाही. वेळ प्रसंगी आंदोलन उभारू असा इशारा सुध्दा कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे विभागीय प्रसिद्धी प्रमुख रा.ना.गावंडे यांनी या सभेत दिला.
सभा तालुकाध्यक्ष अनिल तायडे यांचे निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती या सभेत शिक्षकांची सेवापुस्तके अध्ययावत करणे.कोणाचेही सेवापुस्तक गहाळ होणार नाही याची दक्षता घेणे.कोरोना कालावधीत व्यवस्थापन समितीच्या ठरावानुसार शिक्षक उपस्थिती ठेवणे.नियमानुसार अर्जित रजा मंजूर करून वेतन काढणे.वैद्यकीय रजा आणि प्रशासकीय बदली झालेल्या शिक्षकांचे प्रवास देयके काढणे.जिपीएफ स्लीफ सर्वांना कार्यालयामार्फत देणे.DCPS धारक सर्व शिक्षक आणि चटोपाध्याय प्रकरणे निकाली काढणे.दरमहा वेतन 5तारखेच्या आत करणे.कार्यालयात सर्व शिक्षक यांना सन्मानाची वागणूक देणे. आदी विषयावर चर्चा होऊन पुढील आठवड्यात गटविकास अधिकारी साहेब, गटशिक्षणाधिकारी साहेब, सभापती साहेब आणि आमदार साहेब यांना निवेदन देण्याचे ठरले.
सभेला तालुकाध्यक्ष अनिल तायडे, सरचिटणीस ललित कांबळे सह सुखलाल भिलावेकर, हेमंतकुमार मोहोड, कैलास नरव्हास, मनीष धांडे, अनिल मोहोड, विजय सगळे, गुळदे सर, ढाकरे सर, सीमा भुजाडे, कीर्ती कांबळे, भावना पैठणकर, सरिता भावे, दीपाली मनवर,वैशाली मोहोड अल्का इंगळे,कल्पना मंडे,प्रांजली अहमदाबादे,ढोके सर,हरले सर,पवन इंगळे उपस्थित होते.