Home आपला मेळघाट अवैद्य मशिदीचे निर्माण झाले कसे ? धार्मिक आड घेऊन जमीन हडपण्याचा प्रकार

अवैद्य मशिदीचे निर्माण झाले कसे ? धार्मिक आड घेऊन जमीन हडपण्याचा प्रकार

1003
0

धारणी प्रजामंच,11/9/2021
मेळघाटात कायद्याला वेशीवर टांगण्याची प्रथाच झाली की काय असा सवाल आता निर्माण होणे सुरू झाले आहे. धारणी अमरावती या मुख्य मार्गावरील ग्रामपंचायत दिया अंतर्गत येणाऱ्या तलाई कॅम्प मध्ये जमीन हडपण्याचा उद्देशाने अवैधरीत्या मस्जिद निर्मितीचे काम करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली असून यावर अद्यापपर्यंत कोणतीच कारवाई न होणे हे अनेक प्रश्नांना जन्म देते,        शासनस्तरावरून मंदिर, मस्जिद किंवा कोणतेही धर्मस्थळाचे बांधकाम करायचे असल्यास थेट गृहमंत्रालयाची परवानगी असल्याशिवाय करता येत नाही, मात्र कोणतीही परवानगी नसताना राजरोसपणे मस्जिद उभारणी करून सामाजिक तेढ निर्माण करण्यास एक प्रकारचा प्रयत्न असल्याचे लक्षात येते. मशिद उभारणीसाठी अपेक्षित असलेल्या निकषांचे पालन करण्यात आले अथवा नाही. याची तपासणी होणे गरजेचे आहे.
ज्या जमिनीवर सध्या मशिद उभारण्यात आली आहे, ती जागा वर्ग दोनची असून शेत सर्वे क्रमांक ३५/२ आहे . १ हेक्टर ६२ आर क्षेत्रफळ असलेले शेत एका व्यक्तीला आपल्या कुटुंबाच्या उपजीविका पूर्ण करण्यासाठी महसूल विभागाकडून देण्यात आले होते, मात्र सख्या बहिणीने खोटे कागदपत्र बनवून शेत हडपल्याचा आरोप करण्यात आला आहे. बहीण इथेच न थांबता अगदी पंधरा दिवसात ते शेत आपल्या मुलीच्या नावावर करून शेताच्या जागेवर लेआउट टाकून विक्री करण्याचा गोरखधंदा केला, भावाने या विरोधात धारणी उपविभागीय कार्यालय येथे खटला दाखल केला होता,न्यायालयाने यावर स्थतीगती देत शेत हडपणाऱ्या बहिणीला पुरावे सादर करण्याचे सांगितले होते, मात्र शेत हडपणाऱ्याची आर्थिक स्थिती बळकट असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव घेतल्याची माहिती आहे. शेत जमीन वर्ग २ ची असून नियमानुसार खरेदी विक्री न झाल्याने आपल्या विरोधात निकाल लागल्यास धार्मिक भावनेच्या आधार घेता येईल, या उद्देशाने शेत जमीन हडपणाऱ्या व्यक्तीने अवैधरित्या मस्जिद बांधकाम केल्याचे लक्षात येते.
ग्राम पंचायत कडे या मस्जिदची कोणतीही नोंद नाही अथवा बांधकाम करण्यास परवानगी दिल्याचे पत्र उपलब्ध नाही मग असे संवेदनशील मस्जिद बांधकाम करण्याची हिम्मत करणे याला अप्रत्यक्ष पणे कोणाचा पाठींबा आहे याचे शोध घेणे गरजेचे आहे.
संबंधितावर फौजदारी गुन्हा कधी दाखल होणार ?
कायद्याचे धिंडवडे उडवून अवैध रित्या मस्जिद बांधकाम करणाऱ्यावर फौजदारी गुन्हे कधी दाखल होईल यावर आता चर्चा रंगू लागली आहे. ग्राम पंचायत, महसूल विभाग, गृह विभाग या पैकी कोणाची परवानगी नसताना स्वार्थापोटी मस्जिद उभारून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा हा प्रकार असल्याने अश्या लोकांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावे अशी मागणी जनतेतून आता अप्रत्यक्षपणे होत आहे.