Home क्राईम अखिल भारतीय बलाई महासभेचे महिला अत्याचार प्रकरणी देशव्यापी निषेध व राष्ट्रपती कडे...

अखिल भारतीय बलाई महासभेचे महिला अत्याचार प्रकरणी देशव्यापी निषेध व राष्ट्रपती कडे फाशीची मागणी

489
0

उज्जैन प्रजामंच,1/10/2020
उत्तर प्रदेशातील हाथरस व बलरामपूर येथे झालेल्या सामूहिक बलात्कारांच्या घटनांना घेऊन अखिल भारतीय बलाई महासभा कडून देशव्यापी निषेध नोंदविण्यात येत असून देशाचे राष्ट्रपती यांना मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात, दिल्ली, झारखंड, बिहार, उत्तरप्रदेश आदी राज्यातील विविध शहरातून निवेदन देण्यात येत आहे, हाथरस व बलरामपूर या दोन्ही घटनेतील राक्षसी प्रवृत्तीच्या या नरधाम आरोपींविरुद्ध जलदगती न्यायालयात खटला चालवून त्यांना फासावर लटकवा,’ अशी मागणी निवेदनात करण्यात येत आहे. या निषेध मोर्च्यात मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला असून अश्या अमानवीय घटनेच्या कार्यवाहीत उत्तरप्रदेश सरकार विलंब करून अप्रत्यक्षपणे सहकार्य करीत असल्याचा आरोप सुध्दा करण्यात येत आहे, उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकार एकीकडे ‘बेटी बचाओ, बेटी पढावो’ या केंद्र सरकारच्या मोहिमेच्या नारा लावून अगदी उलट कारभार करीत आहे, या घटनेमुळे अख्खा देश हादरला असतांना योगी सरकार उत्तर प्रदेश येथील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पोलिसांची पाठराखण करीत असल्याचे गंभीर चित्र असून यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला बळ मिळत आहे. बलात्कार आणि खून याचे सत्र सुरु असताना सरकार मात्र गुन्हेगारी कमी होत असल्याचा खोटा दावा करीत आहे. पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, आणि बलात्कारी नराधमांना तात्काळ फाशी व्हावी, अन्यथा अखिल भारतीय बलाई महासभा भविष्यात देश भर तीव्र आंदोलन छेळणार असल्याची माहिती अखिल भारतीय बलाई महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबुलाल बछेर यांनी दिली आहे