Home महाराष्ट्र अविनाश लोमटे यांना जिल्हास्तर आदर्श शिक्षक पुरस्कार

अविनाश लोमटे यांना जिल्हास्तर आदर्श शिक्षक पुरस्कार

386
0

जालना प्रजामंच,१५/०९/२०२०
दरवर्षी पाच सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांच्या कार्याचा सन्मान म्हणून जिल्ह्यातील शिक्षकांना जिल्हा परिषद जालना तर्फे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येतो यावर्षी विभागीय आयुक्तांच्या मान्यतेने जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी पात्र ठरलेल्या शिक्षकांची यादी जिल्हा परिषदेने प्रसिद्ध केली. मंठा तालुक्यातील प्रा.शा.श्रीराम तांडा शाळेतील शिक्षक अविनाश राजेंद्र लोमटे यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला. अविनाश लोमटे यांनी आपल्या सेवेची सुरुवात प्रा.शा.माळतोंडी शाळेपासून केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांचे आवड निर्माण करून एकाच वर्षी अकरा विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनविले तसेच सहा विद्यार्थी नवोदय विद्यालय साठी पात्र झाले मंठा तालुक्यात लोकवर्गणीतून शाळा समृद्ध करण्यास सुरुवात त्यांनी माळतोंडी शाळेपासून केली. तसेच विरगव्हाण तांडा शाळा देखील लोकवर्गणीच्या माध्यमातून भौतिक व गुणवत्तेच्या बाबतीत नावारूपास आणली.त्यांनी केलेल्या सर्वोत्कृष्ट कार्याचा सन्मान म्हणून यावर्षी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी त्यांची जिल्हा परिषदेने निवड केली.
या निवडीबद्दल आमदार राजेश राठोड,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राहुल लोणीकर,पंचायत समिती सभापती, उपसभापती, शालेय व्यवस्थापन समिती,गटशिक्षणाधिकारी सतीश शिंदे,शिक्षक परिषदेचे विभागीय कोषाध्यक्ष भगवान जायभाये, मंगेश जैवाळ,विकास पोथरे,कल्याण बागल,विष्णू कदम, राम सोळंके, कैलास उबाळे,जगदीश कुडे,हरीभाऊ ताठे,एन.जी.पठाण, संजय भवर, डॉ गोपाळ तुपकर,अमोल सोनटक्के,सुनील मोरे,राजीव हजारे, गणेश खराबे,सुनील राठोड,पंजाब वाघ आदींसह तालुक्यातील पदाधिकारी, अधिकारी आणि शिक्षक बांधवांनी त्यांचे अभिनंदन केले.