Home अमरावती होळी अपमान प्रकरण : राणा दाम्पत्याच्या फोटोला चप्पलाचे हार घालून शिवसेनेचा जिल्हा...

होळी अपमान प्रकरण : राणा दाम्पत्याच्या फोटोला चप्पलाचे हार घालून शिवसेनेचा जिल्हा कचेरीवर आंदोलन तर बिरसा क्रांती दलाकडून निषेध

1145
0

अमरावती प्रजामंच,३१/३/२०२१
मेळघाटात होळीचा सण साजरा करण्यास आलेल्या खासदार व आमदार या संवैधानिक पदावर विराजमान असणाऱ्या राणा दाम्पत्यांकडून हरिसाल येथे होळीच्या प्रतिमेवर शिवकुमार आणि रेड्डी यांचे फोटो लावून चप्पलाचे हार घालून त्यांना चप्पलाने मारणे भोवले असून राज्यात याचे पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. होळी हा हिंदू धर्माचा पवित्र सण असून होळीला फुलांचा हार घालण्याचा ऐवजी खासदार, आमदार असणाऱ्या राणा दाम्पत्याने चक्क चप्पलांचा हार घालून धर्माचा अपमान केला आहे. प्रसिद्धी मिळविण्याचा नादात हिंदू धर्माचा देवी देवतांचा अपमान करण्यास हि सोडले नाही, खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा हे दोघेही हिंदू धर्म विरोधी असून यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी जिल्हा कचेरीवर आंदोलन करतांना अमरावती जिल्हा शिवसेनेकडून करण्यात आली.यावेळी खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या फोटोला चप्पलांचा हार घालून निषेध नोंदविण्यात आला. जेष्ठ शिवसेना नेता सुधीर सूर्यवंशी यांनी सांगितले की, लवकरच राणा दाम्पत्य खासदार, आमदार यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा धारणी ठाण्यात दाखल होणार असून वेळ प्रसंगी राज्यभर आंदोलन होण्याची शक्यता दर्शविली आहे.
दुसरीकडे मेळघाट दौऱ्यावर असलेल्या खासदार, आमदार दाम्पत्याचा दौरा चिखलदरा तालुक्यातील चुर्णी भागात होता, मात्र त्या भागात बिरसा क्रांती दल काळे झंडे दाखवून निषेध नोंदविणार असल्याने या भागातील दौरे रद्द झाल्याची माहिती सूत्रांनी दिली, त्यामुळे काळे कपडे घालून बिरसा क्रांती दल व महाराष्ट्र जनक्रांती सेना ने निषेध नोंदविला आहे. यावेळी महाराष्ट्र जन क्रांती सेना व बिरसा क्रांती दलचे चिखलदरा प्रमुख संजू साकोम,शिवा जामूनकर. विनोद धिकार, कृष्णा बावणे, राजेंद्र कासदेकर, राजेश जमूनकर, शिवराम जमूनकर, जितेंद्र बेठेकर, गणेश बेठेकर, हरी अखंडे, राजू बावणे, श्रीराम धिकार, मिश्रा, सुरेंद्र आदी उपस्थित होते.