Home अमरावती अमरावती पंचायत समितीवर शिक्षकांची धडक

अमरावती पंचायत समितीवर शिक्षकांची धडक

42
0

गटशिक्षणाधिकारी यांना प्राथमिक शिक्षक समितीचे निवेदन
अमरावती प्रजामंच,८/१०/२०२०
पं.स. अमरावती अंतर्गत शिक्षकाचे प्रश्न सहा वेळा लेखी देवुनही निकाली निघालेले नाहीत शिक्षण विभाग, लेखा विभागातील कर्मचारी आपआपली कारणे सांगतात आणि प्रश्न प्रलंबीत ठेवतात, वारंवार लेखी निवेदन दिलेले आहे, परंतु प्रश्न सुटलेले नाही म्हणुन शिक्षक समितीच्या शिष्ठमंडळाने अमरावती पं.स. गटशिक्षणाधिकारी डाॅ.नितिन उंडे यांना निवेदन सादर करुन चर्चा केली.यामध्ये शिक्षकांचे वेतन दर महिन्याला देयके शिक्षण विभागातुन २५ तारखेच्या आत लेखाविभागाला तपासणी साठी देण्यात यावे. शिक्षकांना गोषणीय अहवालाची प्रत देण्यात यावी, जिपिएफ, एल.आय. सी. विमा कपात केलेला निधीचे शेडयुल गेल्या ११ महिण्यापासुन
संबंधीत कार्यालयात पाठविण्यात आलेले नाही त्यामुळे अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहे, ते पाठविण्यात यावे, सहा वेतन आयोगाचे थकित हप्ते शिक्षकांच्या जि.पी.एफ खात्यामध्ये जमा करण्यात यावे, त्यामध्ये काही आक्षेप असल्यास कळविण्यात यावे. सातवे वेतन आयोगाचा पहिला व दुसरा हप्ता शिक्षकांच्या जि.पी.एफ खात्यामध्ये जमा करण्यात यावे, त्यामध्ये काही आक्षेप असल्यास कळविण्यात यावे. सातव्या वेतन आयोगानुसार निश्चित केलेल्या सर्व शिक्षकांच्या वेतन निश्चितीला स्विकृती देण्यात यावी.चट्टोपाध्याय (वरिष्ठ श्रेणी) प्रकरणाचे अरिअर्स देण्यात यावे आणि संबंधीत प्रकरणाना स्विकृती घेण्यात यावी,वरिष्ठ व निवड श्रेणीच प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालयात पाठविण्यात यावे,शिक्षकांची कपात केलेली इन्कम टॅक्स ची रक्कम त्याचे खात्यात वेळेवर कार्यालयाला जमा करण्यात यावी, परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना अंतर्गत शिक्षक कर्मचान्यांचे सन २०११ते २०१४वित्त वर्षातील लेखा विवरण मिळण्यात यावे. पंचायत समिती अमरावती कार्यरत शिक्षकांच्या जिपीएफ व डीसीपीएस स्लीप जि.प. कार्यालयातुन आणण्यात याव्यात,शिक्षकांच्या सेवा पुस्तीकेत वेतन वाढ, शाळा रुजु नोंद, सातवा वेतन आयोग नोंद, नामनिर्देशन नोंदी ऑनलाईन करण्याचे निर्देश आहेत. यासाठी विशेष कॅम्प लावण्यात यावा, शाळांचे विजबील भरण्यात ग्राम पंचायती टाळाटाळ करीत आहे. मागील ४-६ महीण्या पासुन शाळांचे विजबिल थकित आहे.शाळांचे थकीत विजबिल ग्रामपंचायत यांच्या निधितुन भरण्यात यावे.प्रविण रा. धाडसे यांची २०१३-२०१४ मध्ये झालेली इन्कम टॅक्स कपात रु.१३,०००/- त्यांच्या पॅन नंबर वर जमा करण्यात यावी, श्री.केशव भोनखडे यांना वरिष्ठ वेतन श्रेणी निश्चिती (चटोपाध्याय) मधील फरकाची रक्कम देण्यात यावी. श्री.प्रल्हाद परतेकी यांचे सातव्या वेतन आयोगाचे चुकीचे निश्चितीकरण दुरुस्त करून त्यांना थकबाकी देण्यात यावी. .कृ.रजनी रमेश वानखडे, शाळा पिपळखुटा यांचे पाच दिवसाचे थकित वेतन काढणे. .लता पावडे यांची २००८ ते २०१५ पर्वत कपात झालेली रु.२,२५०/- हो रक्कम जि.पी.एफ खात्यामध्ये व्याजासह जमा करण्यात यावी. .पं.स.अमरावती नविन इमारत बांधण्यात यावी.यावेळी शिक्षक समितीचे जिल्हा सरचिटणीस तथा तालकाध्यक्ष संभाजी रेवावे, शिक्षण विस्तार अधिकारी सुनंदाताई साव व दिलीप तानोलकर तालूका सरचिटणीस संजय बाबरे, दिलीप कोठे कार्याध्यक्ष,महिला आघाडी अध्यक्ष लताताई टेंभरे, मार्गदर्शक अंजुताई मकेश्वर उच्च श्रेणी मुख्याध्यापिका, जयेश्वर बुरघाटे, सचिव मनोज ओकटे, तालुका संघटक चंद्रकान्त कुरळकर, विजय उमप, सुनिताताई ठाकूर, संजय राउत, प्रदीप मडघे, विषयतज्ञ वैशाली व-हाडे, भुषण उंबरकर सुभाष फिरके, योगेश देशमुख, नरेंद्र पाचघरे,नलीनी गोरे शिक्षक समितीचे पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते.