Home अकोला शिव सेना आमदार डॉ. संजय रायमुलकर यांची जात बलाई नसून सुतार!

शिव सेना आमदार डॉ. संजय रायमुलकर यांची जात बलाई नसून सुतार!

622
0

जात वैधता समितीला लाच देवून बलाई जातीचे प्रमाण पत्र मिळविले.

नागपूर प्रजामंच ऑनलाईन

बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. संजय रायमुलकर (शिवसेना) यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सदस्यांना प्रत्येकी ५० लाख रुपये लाच देऊन बलाई-अनुसूचित जातीचे वैधता प्रमाणपत्र मिळविले असा आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल रिट याचिकेत करण्यात आला आहे.
दौलत मानकर असे याचिकाकर्त्याचे नाव आहे. समितीमधील सदस्य आय.एस. किटकारे, व्ही.एस. शिंदे व एम.जी. वाठ हे रायमुलकर यांच्या मर्जीतील आहेत. त्यांनी एकूण दीड कोटी रुपये घेऊन १० आक्टोबर २०१७ रोजी रायमुलकर यांना अनुसूचित जातीचे वैधता प्रमाणपत्र दिले. परंतु, रायमुलकर हे सुतार जातीचे असून ही जात इतर मागासवर्गीय प्रवर्गात मोडते. रायमुलकर यांच्या शालेय कागदपत्रांवर सुतार जातीचा उल्लेख आहे. तसेच, त्यांचे पणजोबा, आजोबा व भावाच्या कागदपत्रांवरदेखील सुतार जातीचाच उल्लेख आहे. केवळ तहसीलदार कार्यालयातील रेकॉर्डमध्ये बलई जातीचा उल्लेख असून ती नोंद दुसऱ्या शाईने केल्याचे तपासणीनंतर सिद्ध झाले आहे. त्यामुळे रायमुलकर यांना अनुसूचित जातीचे वैधता प्रमाणपत्र देण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा व समितीच्या सदस्यांवर कारवाई करण्यात यावी असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.