Home आपला मेळघाट आपल्या मर्जीने गौण खनिज परवाना देवू नये-उपजिल्हाधिकारी मित्ताली सेठी (प्रजामंचच्या बातमीची दखल)

आपल्या मर्जीने गौण खनिज परवाना देवू नये-उपजिल्हाधिकारी मित्ताली सेठी (प्रजामंचच्या बातमीची दखल)

496
0

तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारीची झळती,
धारणी प्रजामंच,30/09/2020
धारणी तहसील कार्यालयातील काही अधिकारी व कर्मचारी यांच्या मिलीभगतने अवैध गौण खनिजला वैध बनवून लाखोंच्या शासकीय महसुलावर डल्ला मारण्याचे काम सुरु असल्याची बातमी ‘जिल्हाधिकारी साहेब, लाखोंच्या अवैध मुरूम उत्खननाला धारणी महसूल विभागाचा पाठींबा !’ या मथळ्याखाली प्रजामंच ने प्रकाशित केली होती त्याची दखल उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मित्ताली सेठी यांनी घेतली असून धारणी तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांची चांगली झळती घेतल्याची माहिती हाती आली आहे.
प्राप्त माहितीनुसार,२९ सप्टेंबर २०२० रोजी मागील एक महिन्यापासून अवैध मुरूम तस्करीला वैध बनवून विक्री होत असल्याची बातमी प्रजामंच ने प्रकाशित केली होती त्याची दखल उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मित्ताली सेठी यांनी घेत दिनांक ३० सप्टेंबर २०२० रोजी तात्काळ गाव स्तरावरील कोतवाल,पोलीस पाटील, तलाठी, सोबतच मंडळ अधिकारी, पोलीस विभाग, तहसीलदार, नायब तहसीलदार व तहसील कार्यालयातील कर्मचारी यांची आढावा बैठक घेवून चांगलीच झळती घेतल्याची माहिती आहे,
तहसील कार्यालयात चालणारे झोल मोल हे योग्य नसल्याचे सांगत कार्यप्रणालीत तत्काळ सुधार न झाल्यास कार्यवाही करण्यात येणार असल्याची तंबी तहसीलदार कार्यालयाला देण्यात आल्याची माहिती असून कोणाला हि आपल्या मर्जीने गौण खनिज परवाना देवू नये, दिल्यास परिणामाला सज्ज राहावे. असे ठणकावून उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मित्ताली सेठी यांनी सांगितले असल्याची माहिती आहे. आकी येथून गाडगा नदीतील रेतीचा उपसा मोठ्या प्रमाणात अवैधपणे झाल्याची बातमी या अगोदर प्रकाशित करण्यात आली.
उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मित्ताली सेठी यांचे प्रशासन अतिशय उत्कृष्ट असल्याचे नागरिकांमध्ये चर्चा आहे मात्र पाहिजे त्याप्रमाणात तहसील कार्यालयाचे सहकार्य मिळत नसल्याची लोकांच्या प्रतिक्रिया आहेत.