दौंडमध्ये गोळीबार तिघांचा मृत्यू  

पुणे प्रजामंच ऑनलाईन

पुणे  जिल्ह्यातील दौंडमध्ये संजय शिंदे नामक व्यक्तीने गोळीबार केल्याने तिघांचा मृत्यू झाल्याची घडना घडली असून एकाच व्यक्तीकडून दोन ठिकाणी हा गोळीबार करण्यात आल्याची माहिती आहे.

बोरावडेनगर, नगर चौकी भागात गोळीबाराची ही घटना घडली. या गोळीबारानंतर दौंडमधील तणाव वाढल्याची माहिती मिळते, त्यामुळे येथे कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

अमोल जाधव, गोपाळ शिंदे आणि अनिल जाधव अशी मृतकांची नावे आहे. गोळीबार करुन संजय शिंदे घरी जाऊन लपून बसला असून त्याच्या घराबाहेर मोठा जमाव जमला आहे.

संजय शिंदे हा एसआरपीचा जवान असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, हा गोळीबार का करण्यात आला, याची अधिक माहिती मिळालेली नाही.