नरखेड येथे सत्यमेव जयते वॉटर कप कार्यशाळ व प्रदर्शनीचे उदघाटन !

कार्यशाळा व प्रदर्शनीला तालुक्यातील युवकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद !

नरखेड प्रजामंच रुपेश वाळके

लोकसहभागातून पाणलोट अाणि जलसंधारणाची मोठी चळवळ उभी करण्यात यशस्वी ठरलेल्या अभिनेता अामिर खान यांच्या पाणी फाउंडेशनतर्फे आयोजित सत्यमेव जयते वाॅटर कप स्पर्धा या वर्षी राज्यातील ७५ तालुक्यांत घेतली जाणार आहे. वाॅटर कप स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्यात (२०१८) राज्यातील १५ हजार गावांना दुष्काळमुक्तीची संधी उपलब्ध हाेणार अाहे त्यामध्ये नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्याचा समावेश आहे .
नरखेड तालुका प्रशासन व पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नातून अभिनेता आमिर खान यांच्या प्रयत्नातून निर्माण झालेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा नरखेड तालुक्यामध्ये सुरू झाली असून त्याकरिता तालुक्यातील नागरिकांना व युवकांना पाणी फाउंडेशन बद्दल माहिती मिळवून देण्याकरिता नरखेड येथे मार्गदर्शन कार्यशाळेचे व प्रदर्शनीचे उद‍्घाटन उप विभागीय अधिकारी प्रसाद मते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नरखेडचे तहसीलदार जयवंत पाटील, गट विकास अधिकारी शेषराव गुलकुंडे , चेतन हिवज , बाल विकास प्रकल्प अधिकारी दुर्गा डेहनकर , तालुका कृषी अधिकारी जाधव म्याडम , जिल्हा परिषद सदस्य गोपाल खंडाते , पंचायत समिती सदस्य मालाताई मूलताईकर पाणी फाउंडेशन चे विभागीय समन्वक चिन्मय फुटाणे , जिल्हा समन्वयक अतुल काळे , यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते .यावेळी उप विभागीय अधिकारी प्रसाद मते म्हणाले की, जलसंधारण क्षेत्रात पाणी फाउंडेशनचे काम उल्लेखनीय आहे. लोकसहभागातून अनेक गावे पाणीदार होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धा २०१८ या कालावधीत होणाऱ्या स्पर्धेत प्रत्येक ग्रामपंचायतीस कशाप्रकारे उतरता येईल व कोणत्या प्रकारची कामे करता येतील, याचे नियोजन कार्यशाळेत करण्यात आले होते.
जिल्हा परिषद सदस्य गोपाल खंडते यांनी राजकारणातील आडवाआडवी व जिरवाजिरवी थांबवून पाणी आडवा व पाणी जिरवा ही लोक चळवळ निर्माण करणे गरजेचे असल्याचे सांगितले.यावेळी कार्यशाळा व प्रदर्शनीला गटविकास अधिकारी , पाणी फाउंडेशनचे समन्वयक, पदाधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, कृषी अधिकारी , कृषी सहायक, अंगणवाडी सेविका , तलाठी, ग्रामरोजगार सेवक,ग्रामपंचायतीचे आजी-माजी सदस्य, बचत गट, गणेश तरुण मंडळ व इतर सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था व सामाजिक कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मातोश्री अंजनाबाई मुंदाफळे समाजकार्य महाविद्यालय नरखेड येथील विद्यार्थी अक्षय साबळे , चेतन निंबुरकर , रोशनी सातपुते , योगिता कळंबे , प्रिया मेहेंद्रे , शीतल तुंमडाम व पाणी फाउंडेशन चे तालुका समन्वयक हेमंत पिकलमुंडे , अतुल तायडे , उज्वल कराळे , गौरी चौधरी , राणी सुर्वे , हरीश खासबागे , शालिनी नेरकर , अतुल पाटील , रवींद्र बिडकर , हर्षल कराळे , बबन धुर्वे, सुमित गोरले , सुनील शर्मा, एजाज खान ,यांच्यासह आदी युवक मंडळींनी अथक परिश्रम घेतले .

 

संपूर्ण