जुगारअड्ड्यात भागिदारीच्या वादातून नागपुरात दुहेरी खुन

नागपूर प्रजामंच ऑनलाईन  

विधिमंडळ अधिवेशनासाठी सुरक्षा फौजफाटा असतानाच, नागपुरात दोन गटांतील वादातून मंगळवारी पहाटे साडेचारच्या सुमारास भररस्त्यात कुख्यात गुंडासह दोघांची हत्या करण्यात आली. संजय बनोदे (३४), बादल शंभरकर (२६) अशी मृतांची नावे असून, त्यांचा साथीदार राजेश यादव याची प्रकृती चिंताजनक आहे.

हल्लेखोर गणेश मेश्राम व मृत एकमेकांच्या ओळखीचे आहेत. सर्वांनी सोमवारी रात्री एकत्र मद्यपान केले. त्यानंतर संजय, बादल व राजेश मोटारसायकलवरून जात असतानाच, मागून मोटारीने आलेल्या गणेशने त्यांना धडक दिली व त्यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. डोक्यावर गंभीर मार लागल्याने भुऱ्या व बादलचा मृत्यू झाला. गणेशच्या जुगारअड्ड्यात भागिदारी मिळावी, यासाठी सुरू असलेल्या वादातूनच हा खून झाल्याची शक्यता आहे.

संपूर्ण