अर्धवट जळालेल्या अवस्थेत अज्ञात महिलेचे मुतदेह सापडले.

अकोला प्रजामंच कुशल भगत

अकोला येथील मोर्णा नदीच्या पात्रात अर्धवट जळालेल्या अवस्थेत अज्ञात महीलेचा मुतदेह आढळुन आला आहे यामुळे परिसारात खळबळ उडाली असून सुरक्षेचा प्रश्न ऐरणी वर आल्याचे बोलल्या जात आहे.हि माहीती पोलीस विभागाला मिळताच रामदास पेठ, पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ घटनास्थळी दाखल होवून पंचनामा करण्यात आला. तपासाला गती मिळावी म्हणून श्वान पथकाला प्रचारण करण्यात आल्याची माहिती आहे.त्याठीकाणी असलेल्या ताज्या पायाच्या ठश्यावरून शोध करण्यात सुलभ होणार असून मृत महीलेचा खुन झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र अद्यापही महीलेची आजुनही ओळख पटली नाही. पोलीस या प्रकाणाचा तपास करीत आहेत.

संपूर्ण