बाळासाहेब ठाकरेची भूमिका नवाजुद्दिन सिद्दिकी साकारणार

मुंबई प्रजामंच ऑनलाईन

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित भव्य चित्रपट लवकरच येतोय. विशेष म्हणजे आतापर्यंत वेगवेगळया भूमिकांच्या माध्यमातून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अष्टपैलू अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी या चित्रपटात बाळासाहेब ठाकरेंच्या प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
संजय राउतांची निर्मीती
नेहमीच आव्हानात्मक भूमिका स्वीकारणा-या नवाजु्द्दीनसाठी ही भूमिकाही तितकीच महत्त्वाची असणार आहे. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत या सिनेमाची निर्मिती करत आहेत. येत्या २१ डिसेंबरला ख्यातनाम सिने अभिनेते अमिताभ बच्चन आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या चित्रपटाची घोषणा करण्यात येणार आहे.
या चित्रपटांचं दिग्दर्शन कोण करणार, सिनेमाचं नाव काय असणार या गोष्टी मात्र अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आल्यात. दरम्यान, बाळासाहेबांची भूमिका कोण साकारणार, अशी विचारणा केल्यानंतर २१ डिसेंबरपर्यंत वाट पाहा, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

संपूर्ण