नरवाटी येथील समाज भवन दुरुस्तीत डस्टचा वापर ग्रामसेवक व कांत्रटदार यांची मिलीभगत

धारणी प्रजामंच,7/1/2019

धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या नरवाटी गावात समाज भवन दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर असून या दुरुस्तीवर लाखो रुपयांची उधळण होत असल्यावर ही काम अतिशय निकृष्ट होत असल्याचे धक्कादायक प्रकार बघायला मिळत आहे, ग्राम पंचायत स्थारावरील बहुतेक काम करणारी यंत्रणा स्वतः ग्राम पंचायत असल्याने ग्राम सेवकाला बोगस व निकृष्ट काम करण्याची मुभा मिळते  या गोष्टीचा फायदा घेत ग्रामसेवक आपल्या जवळच्या एखाद्या कांत्रटादाराला हाती घेऊन विकास कामे करत असल्याची दृश्ये सर्रासपणे मेळघाटात बघायला मिळतात. अशीच अवस्था नरवाटी येथील समाज भवन दुरुस्तीची असल्याची शक्यता नाकारता येत नाही,लाखो रुपये दुरुस्तीवर उधळण्यात येणाऱ्या नरवाटी येथील समाज भवन दुरुस्तीसाठी सर्रासपणे डस्टचा वापर करण्यात येत असून याकडे ग्रामसेवकाचे कोणतेही लक्ष नसल्याने अप्रत्यक्षपणे नेमण्यात आलेल्या कांत्रटदार आपली मनमानी चालवून सर्व दुरुस्तीचे काम निकृष्ट  दर्जाचे करत आहे, दुरुस्तीमध्ये सामाविष्ट सर्व गोष्टी पूर्ण ना करता फक्त त्या समाज भवनावरील टिनपत्रे बदलून थातुर मातुर दुरुस्ती करून दुरुस्तीचे काम आटोपण्याचा प्रयत्न केला जात आहे,

संबंधित काम करणाऱ्या मजुरांना हे दुरुस्तीचे काम कोण करत आहे  विचारले असता कपिल जैस्वाल नामक कांत्रटदार असल्याचे सांगण्यात आले, मात्र या विषयी अधिकृत कोणता ही पुरावा मिळाला नाही कारण असे कांत्रटदार अप्रत्यक्ष आपली कर्तव्ये पार पाडत असतात, विशेष बाब म्हणजे कपिल जैस्वाल यांनी  हरदोली  ग्राम पंचायत अंतर्गत पोहरा येथील  बहुतेक केलेली कामे अतिशय निकृष्ट झाल्याने  ग्राम पंचायत मध्ये  पोहरा गावातील नागरिक व ग्राम सेवक यांच्या मध्ये मोठा तणाव  निर्माण झाला होता गावात फूट पाडून आपली बोगस कामे लपविण्याचा प्रकार कपिल जैस्वाल करतो असा आरोप होऊन मोठ्या प्रमाणात पोहरा वासियांनी पंचायत समिती स्थरावर व पोलीस ठाण्यात तक्रार केली होती असे असतांना अश्या लोकांना ग्रामसेवक काम अधिक कमिशन पोटी देत असल्याचे बोलल्या जात आहे.

संपूर्ण