भारत मातेचा सुपुत्र शहिद वीर मुन्नाला सशस्त्र मानवंदनासह अंतिम निरोप, दर्शनाला हजारोच्या संख्येने जनसागर उसळला.

मुन्ना सेलूकर अमर रहे,जब तक सुरज चाँद रहेगा मुन्ना तेरा नाम रहेगा . च्या घोषणा
मेळघाट प्रजामंच 6/1/2019 6/6/1/2019
मेळघाटाच्या चिखलदरा तालुक्यातील मुळचे चुर्णी या गावातील शहिद वीर मुन्ना पुनाजी सेलूकर हे बिहार रेजिमेंटमध्ये कार्यरत होते.शहिद मुन्ना सेलूकर यांना दि. 3 जानेवारी 2019 रोजी वीरमरण प्राप्त झाले. त्यांच्यावर 6 जानेवारीला त्यांच्या मूळ गावी चुरणी येथे दुपारी १. ०० वाजता शासकीय इतमामात सशस्त्र मानवंदना देऊन पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहीद मुन्ना यांच्या अंतिम दर्शनाला हजारोच्या संख्येने लोकांनी गर्दी केली. यामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचीही उपस्थिती होती, भारत देशाचा कर्तव्यदक्ष सुपुत्र हरविल्याने दुःखाचे डोंगर कोसळले होते.
शहीद मुन्ना सेलूकर अमर रहे चा नारा, भारत माता की जय, हजारोच्या संख्येने उपस्थित लोकांनी लावले. अंतिम दर्शनाला अमरावती जिल्ह्याचे पालक मंत्री प्रवीण पोटे,खासदार आनंदराव अडसूळ, मेळघाटचे आमदार प्रभुदास भिलावेकर, माजी आमदार राजकुमार पटेल,माजी आमदार केवलराम काळे, धारणी पंचायत समिती सभापती रोहित पटेल, उपसभापती जगदीश हेगडे, चुर्णी जिल्हा परिषद सर्कल सदस्य पूजा येवले, चिखलदरा कांग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष मिश्रीलाल झाडखंडे जि.प. सदस्य दयाराम काळे,प्रकाश घाडगे, राजेश सेमलकर, दिनेश बुब, रोहित पाल भारतीय जनता पक्षाचे दिनेश बचले, साबूलाल पाटणकर,यांच्यासह शेकडो सर्वच राजकीय पक्षातील पदाधिकाऱयांनी उपस्थिती राहून आदरांजली वाहिली.
यावेळी उपविभागीय अधिकारी राहुल कार्डिले, चिखलदरा तालुक्याचे तहसीलदार, चिखलदरा येथील पोलीस निरीक्षक यांच्या सह इतर ही अधिकारी,कर्मचारी उपस्थितीत होते, मेळघाटसह मध्यप्रदेश राज्यातील माजी सैनिक आवार्जून उपस्थित होते, सैन्य दलातर्फे तसेच स्थानिक दलातर्फे सशस्त्र मानवंदना देण्यात आली. देशाच्या सुरक्षेसाठी अरुणाचल प्रदेशमध्ये कर्तव्यावर तैनात असतांना हिमस्खलनामुळे बर्फात दबून शहिद वीर मुन्ना सेलुकर यांना वीरमरण आले.त्यांचे पार्थिव शनिवारी रात्री उशिरा चिखलदरा तालुक्यातील चूर्णी या गावात पोहोचताच ग्रामस्थांनी भारत माता की जय, मुन्ना सेलूकर अमर रहे, अशा घोषणा दिल्या. शहिद मुन्ना सेलूकर यांच्या बहीण रामकली सेलूकर, वडील पूनाजी सेलूकर भाऊ रावजी सेलूकर, रामदास सेलूकर, सुंदरलाल सेलूकर यांनी प्रचंड आक्रोश करत मुन्ना सेलूकरचे अंत्यदर्शन घेतले.

संपूर्ण