धारणी तालुका काँग्रेस अध्यक्षपदी महेंद्रसिंग गैलवार यांची नियुक्ती

धारणी प्रजामंच,27/12/2018
हरिसाल जिल्हा परिषद सर्कल सदस्य महेंद्रसिंग गैलवार यांची धारणी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती झाली आहे, महेंद्रसिंग गैलवार मागील दहा वर्षापासून जिल्हा परिषद सदस्य या पदावर कायम आहेत, तर वीस वर्षापासून धारणी कृषी उत्पन्न बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदावर ठाण मांडून आहे आता त्यांच्याकडे धारणी तालुका काँग्रेस पक्षाची मोट बांधण्याचे पुन्हा सोपवण्यात आली आहे, गैलवार यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी केली असून यानिमित्ताने सर्वत्र महेंद्र गेल्यावर यांचे अभिनंदन होत आहे, माजी तालुकाध्यक्ष राजा पाटील याची नियुक्ती सेवा दल प्रमुख म्हणून करण्यात आली असून आहे, मागील काही वर्षापासून धारणी तालुक्यात राष्ट्रीय काँग्रेस पक्षात कार्यकर्त्यांमध्ये निराशा पसरलेली होती ती आता गैलवार दूर करतील का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. धारणी शहर अध्यक्ष अश्फाक, जिल्हा परिषद सदस्य वनिता पाल, राजा खान, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पंकज मोरे, वीरेंद्र पांडे, रहीम भाई, गंगा जावरकर, सलमान, संजय लायदे, गंगा जावरकर, मधु वानखडे, प्रमोद वानखडे, राजकिशोर मालवीय, कैलास पाटील, बोरकर, शैलेश महाला, राजेश्री मालकर, राजेश सेमलकर, कैलास पटेल, रामगोपाल मावस्कर, रेखा पटेल, अरुण भावसार, खान, अफजलखान, सूर्या मालवीय, योगेश राऊत, शेख रफीक, राहुल सोनवणे, मोडक, मनीष मालवीय, आदि शेकडो कार्यकर्त्यांनी महेंद्रसिंग गैलवार यांचे अभिनंदन केले

संपूर्ण