दुनी येथील नानासाहेब भिसे कनिष्ठ महाविद्यालयाचे श्रम संस्कार शिबीर संपन्न

धारणी प्रजामंच,27/12/2018 
दुनी येथील नानासाहेब भिसे कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत दत्तक ग्राम बोड येथे श्रम संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले शिबिराचा २४ डिसेंबर२०१८ रोजी समारोप करण्यात आले. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण महर्षी नानासाहेब भिसे प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्षा मीनाताई मालवीय संस्थेचे सचिव रमेशपंत जिराफे सदस्य अरविंद मेहता धारणीच्या नगरसेविका क्षमाताई चौकाशे पोलीस पाटील जयराम जांभेकर सरपंच लालजी जावरकर प्राचार्य व्ही डी भापकर आदी उपस्थित होते. सर्व पाहुण्यांनी समारोपीय कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी श्रमदानातून केलेल्या कामाचे कौतुक करून मार्गदर्शन केले शिबिरामध्ये एकूण २५ विद्यार्थी व २५ विद्यार्थिनी असे एकूण ५० विद्यार्थयांनी सहभाग घेतला, विशेष म्हणजे एवढ्या कडाक्याच्या थंडीत विद्यार्थी व विद्यार्थिनी बोड या गावी मुक्कामी होते विद्यार्थ्यांनी ७ दिवसाच्या या शिबिरात बोड गावाशेजारील नदीवर बंधारा तयार केला तसेच संत जाटू बाबा मंदिर परिसर स्वच्छ केले. नाली सफाई, खड्डे स्वच्छ करणे व गावामध्ये इतर स्वच्छता केली दुपारच्या बौद्धिक सत्रात विविध तज्ञांकडून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले, रात्री आठ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून गावातील आदिवासी लोकांमध्ये व्यसनाधिनता अंधश्रद्धा कुपोषण व अनिष्ट प्रथांविरुद्ध जनजागृती केली तसेच या शिबिरामध्ये पशुरोग निदान शिबिर आणि रासेयो शिबिरामध्ये सहभागी विद्यार्थीसाठी वैद्यकीय तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी सात दिवसाच्या शिबिरांमध्ये केलेल्या कामाचे गावकऱ्यांनी कौतुक केले त्याची पोचपावती म्हणून गावकऱ्यांनी समारोपीय कार्यक्रमात शिबिरांमध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी बक्षिसे देऊन विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. सदर शिबिर कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. समारोपीय कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक सचिन भैय्या तर आभार प्रदर्शन प्राध्यापक गजानन खरात यांनी केले शिबिर यशस्वी होण्यासाठी द्यान मंदिर माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

संपूर्ण