धारणी येथे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी

धारणी प्रजामंच,27/12/2018
संपूर्ण देशात सन्मानित असे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जयंतीच्या निमिताने धारणी येथील हरगोविंदास छात्रावास येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, या प्रसंगी धारणी तालुका भाजपच्या कल्याणासाठी विविध क्षेत्रातील आपले कर्तव्य बजावणारी भाजपच्या या वरिष्ठ नेत्यांचे व कर्तव्य दक्ष अधिकारी कर्मचाऱयांचे सत्कार करण्यात आले.यामध्ये पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी,ज्येष्ठ वकील मनवर, पोलिस अनिल जारेकर, वृत्तपत्र वितरक निलेश सेलेकर, प्रदीप, पॉवर सहाय्यक सुनील कासदेकर, नगर पंचायत सेवक रामचंद्रजी खाडे, वैद्यकीय सहाय्यक डॉ. खडे, भाजपचे ज्येष्ठ नेते सुभाष गुप्ता, डॉ सुरेंद्रनजी पटेल, अशोक गुप्ता, ज्येष्ठ पत्रकार रवि नवालाखे, सुधाकर पंकडे, उमेशजी नवलाखे, रेखा नल्लमवार आदी सत्कारमूरतींचा समावेश होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष, सांस्कृतिक संचालक रतनजी परिहार, मुख्य प्रमुख पाहुणे पुरोहजित सर, सुरेंद्र पटेल होते. सोबतच क्षमा चौकसे,नरबदी धांडे, विजयलक्ष्मी जैस्वाल, सौमत्ती कसदेकर, प.सदस्य तारासिंग कासदेकर,प्रीतम सरागे, संतोष परिहार, विवेक नवलाखे, श्याम गंगराडे, सुशील गुप्ता आदी कार्यकर्ते उपस्थित होते, संचालन योगेश खाडे यांनी केले, प्रास्ताविक अप्पा पाटील व आभार क्षमा चौकसे यांनी केले कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी संतोष परीहार, योगेश खाडे, प्रीतम सरागे, अप्पा पाटील यांनी परिश्रम घेतले

संपूर्ण