धारणीत प्रथम स्तरीय क्रिडामहोत्सव संपन्न

धारणी, प्रजामंच 25/12/2018
धारणी तालुक्यात जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे नुकतेच प्रथम स्तरीय क्रीड़ा महोत्सव पार पड़ला. धारणी येथील जिल्हा परिषद मुलांच्या शाळेत तालुक्यातील धारणी, दुनी व बिजुधावड़ी या तिन केंद्रा अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग होता क्रीड़ा महोत्सव कार्यक्रमाचे उदघाटन माजी आमदार राजकुमार पटेल यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून जि.प. सदस्या सौ.मायाताई मालवीय तर प्रमुख अतिथि म्हणून सामाजिक कार्यकर्ते प्रकाश भाऊ घाडगे,गटशिक्षणाधिकारी मो. युनूस, केंद्र प्रमुख कल्पना ठाकरे, अशोक इंगोले, अजित दादा पाटील,कोकाटे,विस्तार अधिकारी, लोकमत चे धारणी शहर प्रतिनिधी पंकज लायदे, संचालक प्रफुल्ल भाऊ शेंडे, मुख्याध्यापक अनिल जाधव, दिलीप भाऊ जावरकर, रामकु कासदेकर कासदेकर, चोले,शेख साबीर,शिक्षक विजय देशमुख,सुरेश भाऊ चिमणकर, सदाशिव मेटकर,हे उपस्थित होते. या क्रीड़ा स्पर्धेमध्ये धारणी दुनी व बिजुधावड़ी या तिन केंद्र अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थयानी सहभाग घेतला होता, शाळानिहाय विद्यार्थ्यानी सास्कृतिक कार्यक्रम व निदर्शने सादर केली त्यामध्ये जिल्हा परिषद शाळा बारू येथील विद्यार्थ्यानी सुंदर असे महाराष्ट्रातील सण उत्सवाचे दर्शन नृत्यातुन घडवूनआणल्याणे प्रेक्षकांना चांगलेच मंत्र मुग्ध केले .विद्यार्थयानी क्रीड़ा स्पर्धेत अथक परिश्रम घेतल्यास त्यांच्या कला व सुप्त गुणांचा विकास घडून येतो असे उदगार माजी आमदार राजकुमार पटेल यानी काढले तर जि.प. सदस्या सौ माया मालवीय यांनी विद्यार्थ्याना व शिक्षकांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्यात.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक कल्पना ठाकरे ,संचलन कु. योगिता भूमर यांनी ,तर आभार प्रदर्शन केंद्रप्रमुख अशोक इंगोले सर यांनी केले. या क्रीड़ा स्पर्धेच्या यशस्वीते करिता प्रभुदास बिसन्दरे,रितेश मालवीय ,तायडे ,नीलेश टोम्पे ,उमेश पटोरकर ,पंकज मालवीय, देवेन्द्र टिब, दिपक पाचोळकर, अनोखीलाल सिटोले संदीप जैस्वाल व इतर शिक्षकांनी परिश्रम घेतले.

संपूर्ण