अमरावती जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांची मध्यप्रदेश राज्यातून अवैध रेती तस्करावर कार्यवाही  

अमरावती प्रजामंच विशेष, १६/१२/२०१८/ 

मेळघाटातील धारणी तालुक्यात अवैध उत्खनन करणारया तस्कारानी विविध शक्ल लढवून रेतीची अवैध चोरी करण्याचा फंडा सुरु केल्याचे उघड झाले, चार दिवसां अगोदर धारणी तालुक्यात अवैध रेती तस्करी होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांना देण्यात आली होती, त्याची तत्काळ दखल  घेवून कार्यवाहीचे आदेश दिले.

या प्रकाराविषयी धारणी तहसीलचे  तहसीलदार, नायब तहसीलदार यांना अवैध रेती वाहतूकीची माहिती दिल्यानंतर ही अवघ्या 7 किमी अंतरावर कोणतेही धारणी येथील महसूल अधिकारी,कर्मचारी पोहचले नाही, त्यामुळे तक्रारकर्त्याला नाईलाजाने अमरावती जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांना दूरध्वनीवरून संपर्क करावा लागला. जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख मध्यप्रदेश राज्याच्या निवडणुकीच्या कामात व्यस्त असतांना अवैध रेती तस्करीच्या तक्रारीची दखल घेतल्याने परराज्यात राहून आपल्या जिल्ह्यावर आपले नियंत्रण कायम असल्याचे सिद्ध केले. जिल्हाधिकारी यांनी या अवैध रेती तस्करीची माहिती धारणी उपविभागीय अधिकारी यांना देऊन कार्यवाहीचे आदेश दिले.

मागील वर्षापासून काही रेती तस्कारांनी नवीन फंडा रेती तस्करीचा शोधून काढल्याचे समोर आले असून हा फंडा म्हणजे महसूल विभागाच्या डोळ्यात तिखट टाकणारा प्रकार आहे, हे रेती तस्कर पूर्वीच  नदीच्या पात्रात रेती उपसून ठेवतात नंतर याची माहिती महसूल विभागाला देवून त्या साठेचा लिलाव करण्यास सांगून ज्यांनी उपसून ठेवली आहे तेच तो रेती साठा खरेदी करतात नंतर १० ब्रास रेती खरेदीच्या नावावर १०० रेती चोरी करतात हा प्रकार हरदा उमरघाट रेती घाट  येथील घटनेवरून उघड झाले आहे, हरदा घाट येथे कोणताच रेती साठा उपलब्ध नसतांना परवान्याच्या नावावर सर्रास नदीच्या पाण्यातून रेतीचा उपसा होत आहे,

धारणी महसूल विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, हरदा घाट वरून अवैध रेती वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर ताब्यात घेतल्याची माहिती आहे, जब्त करण्यात आलेल्या ट्रॅक्टरचे क्रमांक एम.एच २७/बी.व्ही.९१६९ असून मालक संदीप जैस्वाल तर दुसऱ्या ट्रॅक्टरचे क्रमांक एम एच २७/बी बी १३५३ असून मालक रोहित रवींद्र कोल्हे असे मालकांची नावे वाहतूक पास वर उल्लेखित आहे, मात्र या वाहतुक  पास वर रेती कोठून कोठे नेत आहे याचा कोणताच उल्लेख नसल्याने संशय निर्माण होतो, ट्रॅक्टरवर क्रमांक नाही तर तहसीलदार यांच्या आदेशावर सुद्धा खोडतोड करण्यात आले आहे. रात्री 7 वाजेनंतर हे दोन्ही ट्रॅक्टर महसूल विभागाने उपविभागीय अधिकारी राहुल कार्डीले यांच्या आदेशान्वे ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले.

तापी नदीत अवैधरित्या होत असलेल्या रेती तस्करी संर्दभात रेतीच्या पावत्या व जप्त केलेल्या नदीतील रेती साठाच्या लिलावाचा संपुर्ण अहवाल मागवण्यात आला आहे, घटना स्थळाची पाहाणी करून  अहवाल सादर करण्याचे आदेश मंडळ अधिकारी व तलाठ्याला देण्यात आले आहे, अहवाल आल्यावर कार्यवाही करण्यात येईल.

                                                                                                                                राहुल कर्ङिले

                                                                                             उपविभागीय अधिकारी (महसुल विभाग)
                                                                                                                धारणी 

संपूर्ण