कुसुमकोट बु. येथे प्राणघातक हल्ला, इसमाचे नाक कापले, आरोपी अटकेत.

पोलिसांच्या सतर्कतेने प्राण वाचले,

धारणी प्रजामंच,6/12/2018    

धारणी वरून अवघ्या 3 कि.मी. अंतरावरील कुसुमकोट बु. येथे बुधवारला     रात्रि 8 .30 च्या सुमारास राणीतंबोली या गावातील इसमावर प्राणघातक हल्ल्यात नाक कापल्या गेल्याची घटना घडली असून या इसमाला अमरावती जिल्हा रुग्णालयात उपाचारासाठी रवाना करण्यात आले असून उपचार सुरु आहे.पोलिसांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ होता होता टाळला.

गम्भीर जखमी इसमाचे नाव सन्तोष यादव वय 55 वर्ष असे असून मत्स व्यवसाय करत असल्याची माहिती मिळते.बुधवारी रात्री काही कारणास्तव संतोष यादव व शे साबिर शे जब्बार उर्फ़ शाहरुख़ या दोघांमध्ये कुसुमकोट गावातील बसस्थानकाजवळ वाद झाला. या वादात शे साबिर शे जब्बार उर्फ़ शाहरुख़ वय 40 वर्ष याने मटनच्या दुकांनात असलेल्या धारधार सत्तूराने संतोष यादव यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला या हल्यात संतोष याची नाक व ओठ कापल्या गेले.या घटनेची माहिती मो. निसार मो. इसाक याने धारणी पोलीसांना दुरध्वनी वर दिली. पोलिस निरीक्षक विलास कुलकर्णी सहा. पो.नि. सौ. प्रीती निचळे, अनिल झारेकर, नंदू पाटमासे यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून संतोष यादव याला रुग्णालयात उपचाराकरिता भरती केले. असून संतोषचा जीव पोलिसाच्या सतर्कतेने वाचला .आरोपी शे साबिर शे जब्बार उर्फ़ शाहरुख़ याने हल्ला चढविल्या नंतर तेथून पळ काढला होता, पोलिसांनी त्याला शोधण्याकरिता रात्रिच शोधमोहिम सुरु केली असता तो रात्रि 11 वाजटाच्या सुमारास कुसुमकोट गावाजवळ शेत शिवारात सापडला, त्याच्यावर कलम 307 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आले आहे.