ग्राम पंचायत कुसुमकोट(बु.) येथील पेविंग ब्लाँक रस्त्याचे काम बोगस व नियमबाह्य

धारणी, प्रजामंच,6/12/2018 

धारणी तालुका स्थळाला लागून असलेल्या कुसुमकोट(बु.) येथे पेविंग ब्लाँकचा रस्ता हनुमान मंदीर पासून नरेंद्र मालवीय यांच्या घरापर्यंत प्रस्तावित करून मंजूर झाला होता मात्र हा रस्ता प्रस्तावित ठिकाणी पूर्ण न बनविता दुसऱ्या ठिकाणी अर्धा बनविण्यात आला त्यामुळे जनतेला गैरसोय होत आहे. पेविंग ब्लाँकने बनविण्यात आलेल्या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट असून पेविंग ब्लाँकचे गुटके आतापासून जागा सोडत आहे. हा पेविंग ब्लाँकचा रस्ता नियमाचे उल्लंघन करून बनविण्यात आले आहे, नियमाप्रमाणे सांडपाणीच्या नालीसाठी जागा सोडणे आवश्यक होते मात्र सांडपाणी नालीला बंद करून एका ग्राम पंचायत सदस्याने आपली मनमानी करीत त्यांच्या नातेवाईकच्या घरासमोर पेविंग ब्लाँकचा अवैध रस्ता बनवून घेतल्याने सामान्य जनतेला खूप त्रास होत असल्याने या विषयी रीतसर लेखी तक्रार समाजसेवक निरज गजानन मालवीय यांनी  धारणी पंचायत समिती गटविकास अधिकारी डॉ. उमेश देशमुख यांच्या कडे केली आहे, गटविकास अधिकारी यांनी कार्यवाही करणार असल्याचे आश्वासन नीरज यांना दिले आहे.

या नियमबाह्य पेविंग ब्लाँकच्या बोगस रस्त्यामुळे सांडपाणीची नाली बंद पडल्याने  परिसरात घाण होवून अस्वच्छता पसरलेली आहे त्यामुळे अवैध बनविण्यात आलेला रस्ता तत्काळ तोडून संबधीत अवैध रस्ता बनविणाऱ्यावर कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी या तक्रारीच्या वतीने करण्यात आली आहे.