मध्यप्रदेश भाजप वरिष्ठ नेता व शासकीय कंत्राटदार विरुद्ध रेती चोरी प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल

अमरावती प्रजामंच,२७/११/२०१८ 

अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यात येणारया हरदा घाटच्या  तापी नदितून तब्बल  2 हजार ब्रास रेती अवैधरीत्या काढून चोरी केल्याप्रकरणी मध्यप्रदेश भाजप वरिष्ठ नेता व शासकीय कंत्राटदार यांच्यावर फौजदारी गुन्हा धारणी येथील पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.

तापी नदी मेळघाट व मध्यप्रदेशातुन वाहते, या तापी नदीतुन अवैधरित्या दोन हजाराहुन अधिक रेताचे उत्खनन केल्याची घटना समोर आली आहे, धारणी महसूल विभागाच्या रेती तस्काराच्या जगतातील प्रथमच मोठा मासा हाती आल्याचे बोलल्या जात आहे,  २ हजार रेती उत्खनन प्रकरणी मध्यप्रदेशातील भाजपचे भैसदेही येथिल वरिष्ठ नेते आणी प्रदेश उपाध्यक्ष दुर्गा चरन ऊर्फ राजा ठाकुर हे आरोपी असून यांच्या विरोधात रेती चोरीचा गुन्हा धारणी पोलीसांनी दाखल केल्याची माहिती मिळाली.

महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या तापी नदीच्या हरदा घाटाच्या पात्रातून हजारो ब्रास रेतीचे अवैधरीतीने  उत्खनन राजरोसपणे करून रेती थेट मध्यप्रदेशातील भैसदेही तहसिल मधिल ऊमरघाट येथे साठविल्या जात असल्याची माहिती विशेष सूत्राकडून मिळाली. मध्यप्रदेश राज्यातील भैसदेही हे तहसील मेळघाटला लागून असल्याने शासकीय कंत्राटदार राजा ठाकूर याची मेळघाटात सुद्धा भरपूर रस्त्याचे व पुलाचे बांधकाम झालीत व काही सुरु असल्याचे बोलल्या जाते,राजा ठाकुर यांचे बांधकाम क्षेत्रात वादग्रस्त नाव असुन मेळघाटात प्रधानमंत्री सङक योजनेर्गंत सुमारे शंभर मोठ्या पुलाचे बांधकाम नाल्या खोरयातील अवैध रेती उत्खनन करून वापर केल्याची चर्चा आता कार्यवाही झाल्यानंतर सुरु झाली आहे,

राजकिय दबावापोटी कोणतीही कार्यवाही होत नसल्यामुळे या रेती तस्कराने व्याघ्र प्रकल्पातुन वाहणाऱ्या खंङू, खापरा, सिपना, गङगा, तापी ह्या नद्यांतून अवैधरीत्या रेतीचा उपसा केल्याचे चर्चेला पेव फुटले आहे, या अवैध उपासामुळे संपुर्ण ङोगरदऱ्यात वेळेपुर्वीच पाण्याचे मोठे संकट उभे ठाकते आहे या गंभिर पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आणी रेती तस्करावर आवर घालण्यासाठी महसुल आणी धारणी पोलीस सरसावले असुन ऐवढ्या मोठ्या प्रमाणात रेती चोरीची ही सिमेवरील अलीकङच्या काळातील ही पहीलीच घटना आहे, बैरागढ येथिल तलाठी रामसिंग दारसिंबे यांनी रेती चोरी प्रकरणी पोलासात फिर्याद दिली पोलीसांनी मुख्य आरोपी राजा ठाकुरच्या विरोधात ३७९, पर्यावरण संरक्षण अधिनियम ५/१५ अनव्ये गुन्हा दाखल केला

बैरागढ येथिल तलाठ्याच्या तक्रारीवरून आरोपीविरूध्द रितसर गुन्हा नोंदविण्यात आला आहे तातङीने आरोपीस अटक करण्यात येईल.
                                                         विलास कुलकर्णी

                                                    पोलीस निरीक्षक,  धारणी