बेनोडा येथे दिंडीसह काकड़ आरतीची समाप्ती

अमरावती, प्रजामंच सचिन अंजीकर24/11/2018

अमरावती सारख्या वरदळीच्या शहरात बेनोडा जहांगीर या परिसरामधे आजही काकड़ आरतीची परंपरा जोपसल्या जात आहे. गेल्या अनेक वर्षापासून काकड़ आरतीची परंपरा बेनोडा येथील युवकांनी व नागरिकांनी जोपासली आहे.  ग्रामीण भागामधे काकड़ आरतीला विशेष महत्व आहे, तेवढेच महत्व अमरावती येथील बेनोडा मधील नागरिकांनी महत्व दिलेले आहे.

कार्तिक महिना हा संताच्या सनिध्यात, सहवासात जावा तसेच वारकरयांची आठवण म्हणून हा महिना दिवाळी सारख्या पावन सणाने साजरा करण्यात येतो. या मुळेच कार्तिक महिन्यात संताचे गुणगान करण्यासाठी काकड़ आरतीचे आयोजन भक्तिभावाने करण्यात येते. परिसरातील नागरिक सकाळी 5 वाजता काकड़ आरती काढण्यासाठी मंदिरात जमतात. मंदिरात आरती करून संत संगताचे गुणगान, भजन, गौळन म्हणत ग्राम प्रदक्षिणा घेतल्यानंतर अंगनात सुरेख रांगोळी काढण्यात येते.

काकड़ दिंडी बेनोडा, तान्त्रिक कॉलोनी, शांती नगर, यशोदा नगर 2, प्रभु कॉलोनी या मार्गे मार्गक्रमण करीत बेनोडा येथील श्री डोमनशेष महाराज यांच्या मंदिरात दिंडीचा समारोप करण्यात आला. काकड़ दिंडीचे मार्गक्रमण करीत असतांना पालखी धारकचे आणि इतर यांचे पाय धुवुन पूजन करण्यात आले.  यावेळी दिगंबर कदम, मुकिन्दा जाचक, बबन कदम, हरिहर आखरे, राजेश वानखड़े, सतीश पडोळे, अनिल कदम, पद्माकर गोलाइत, अशोक सोनटक्के, संदीप कदम, आशाताई अंजीकर, मीना कदम, शर्मिला कदम, इंदिरा कदम, द्यानेश्वर कदम यांच्यासह परिसरातील असंख्य नागरिक मोठ्या संखेने सहभागी झाले होते, त्यामुळे परिसरामधे भक्तिमय वातावरण पसरलेले होते.