अमरावती लोकसभा 2019 च्या निवडणुकीसाठी भाजपतून विजय विल्हेकर लढण्यास इच्छुक, मेळघाटला भेट,

अमरावती,प्रजामंच,24/11/2018 

2019 च्या लोकसभा निवडणुकीचे वाऱ्यांना आत्तापासूनच वेग आल्याचे दिसते, त्यानुसार उमेदवारांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली असून सर्व इच्छुक उमेदवारांचा डोळा मेळघाट या दुर्गम भागाकडे असल्याने प्रत्येक इच्छुक उमेदवार मेळघाटला भेट देत आहे, काही दिवसांपूर्वी पुणे येथे राहणाऱ्या सीमा सावळे हे भारतीय जनता पार्टी च्या संभाव्य उमेदवार असल्याची चर्चा शमली नाही,सीमा सावळे यांनी काही ठिकाणी कार्यक्रम सुद्धा घेतले,असे असतांना चांदूरबाजार नगर परिषदचे विद्यमान उपाध्यक्ष विजय विल्हेकर यांनी सुद्धा अमरावती लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याची इच्छ व्यक्त केली भाजप या पक्षातून उमेदवार असणार असल्याचे सांगितले यामुळे अमरावती भाजप राजकीय गोटात नवीन समीकरण निर्माण झाले आहे, भाजपकडे आता दोन उमेदवार झाले आहे, विजय विल्हेकर हे स्थानिक तर सीमा सावळे ह्या आयात उमेदवार आहे, सीमा सावळे यांनी बडणेरा, मेळघाट विधानसभा क्षेत्रामध्ये दौरा करून भाजपच्या संभाव्य उमेदवार असल्याचे सांगत जनतेशी संवाद साधला. अमरावती लोकसभा मतदारसंघातून सीमा सावळे भारतीय जनता पार्टीच्या संभाव्य उमेदवार एकमेव होत्या मात्र त्यांना स्पर्धक म्हणून चांदुरबाजार येथील रहिवासी असलेले विजय मारोतराव विल्हेकर हे समोर आल्याने भाजपसमोर नवा पेच निर्माण झाला आहे,

विजय विल्हेकर यांची जमेची बाजू अमरावती लोकसभा मतदार संघाचे स्थानिक उमेदवार असून भाजपचे निष्ठावान कार्यकर्ता आहे. सध्या चांदूरबाजार नगरपरिषद मध्ये उपाध्यक्ष या पदावर विराजमान आहे, विजय विल्हेकर यांचे भाऊ रामदास मारोतराव विल्हेकर नप मध्ये सदस्य राहिले आहेत तर वहिनी आशाताई रामदास विल्हेकर यांनी चांदूरबाजार नगरपरिषद मध्ये नगराध्यक्ष पद भूषवले. मागील तीस वर्षांपासून विल्हेकर कुटुंबीय भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ता म्हणून पक्षाचे काम करत आहे, त्यामुळे 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी अमरावती मतदारसंघांमधून निवडणूक लढविण्याचे इच्छा विजय विल्हेकर यांनी व्यक्त केली,अमरावती मतदारसंघातील स्थानिक व भारतीय जनता पार्टीचे निष्ठावान कार्यकर्ता असल्याने आपल्याला तिकीट मिळेल अशी प्रबळ आशा विजय विल्हेकर यांनी व्यक्त केली,

विजय विल्हेकर यांनी नुकतेच मेळघाटचा दौरा केला असून मेळघाटातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ता यांच्याशी भेट घेतल्याची माहिती मिळते, सोबतच छोट्या छोट्या कार्यक्रमांमध्ये भेटी देऊन आपण लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे विजय विल्हेकर यांनी जनतेत मत व्यक्त केले सध्या अमरावती लोकसभा मतदारसंघ मागील दहा वर्षापासून बाहेरील उमेदवार असल्याने जनतेचे प्रश्न सुटत नसल्याची ओरड सतत होत आहे त्या अनुषंगाने आता मतदारांचा कल हा जवळपास स्थानिक उमेदवार यांच्याकडेच असल्याचे दिसून येते त्यामुळे स्थानिक उमेदवाराला या गोष्टीचा अधिक फायदा होण्याची शक्यता सध्या तरी दिसून येत आहे