ब्लॅकमेल करणाऱ्या युवक अध्यक्षाची हकालपट्टी

धारणी प्रजामंच,२४/११/२०१८

धारणी तालुक्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दीपक नागले याने एका प्रकरणात आपल्या पदाचा गैरवापर करत अधिकाऱ्याला ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न केल्याची वृत्त प्रजामंचने प्रकाशित केले होते, त्या अनुषंगाने राष्ट्रवादी युवक काँग्रेस अमरावती जिल्हा अध्यक्ष नितीन देशमुख यांनी वृत्ताची दखल घेत तत्काळ हकालपट्टी केली आहे, पदाचा ब्लॅकमेलिंगसाठी वापर करून पक्षाची प्रतिष्ठा मलीन करणाऱ्या व्यक्तीला निष्कासित करून पक्षातून  हकालपट्टीचा निर्णयामुळे मेळघाटात पक्षावर लागलेला डाग पुसण्यात आल्याचे दिसते,या हकालपट्टीने राष्ट्रवादी पक्षात असे प्रकार सहन केले जात नाही असा संदेश सामान्य जनतेत गेला आहे, पक्षाची जो कोणी प्रतिष्ठा मलीन करेल त्याला पक्षात स्थान नाही असे मत राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष नितीन देशमुख यांनी सांगितले. पक्षात पदाचा गैरवापर करणे हे अतिशय चुकीची बाब आहे यामुळे पक्षाची प्रतिष्ठा सोबतच जनतेवर याचा परिणाम वाईट होतो त्यामुळे युवकांनी काम करीत असतांना आपल्या अंगावर असे धाग लागणार नाही याची दक्षता घेणे अत्यावश्यक असल्याचे म्हटले.