अमरावती जिल्ह्यात तासिका तत्वावर शिक्षक पदांसाठी अर्ज आमंत्रित

अमरावती, प्रजामंच,24/11/2018

समाजकल्याण विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांमुलींच्या शासकीय निवासी शाळांत इयत्ता सहावी ते दहावीपर्यंत तासिका तत्वावर सहायक शिक्षकांच्या पदभरतीसाठी दि.28 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी येथील शाळेसाठी प्राथमिक शिक्षकाच्या दोन जागा, तर हिंगणगाव (धामणगाव रेल्वे) येथील शाळेसाठी प्राथमिक शिक्षकाची एक जागा, सामदा (दर्यापूर) येथील शाळेत माध्यमिक शिक्षकाच्या दोन, बेनोडा (वरूड) येथील शाळेसाठी माध्यमिक शिक्षकाची एक जागा आणि तुळजापूर (चांदूर रेल्वे) येथील शाळेसाठी प्राथमिक शिक्षकाच्या दोन जागा तासिका तत्वावर भरण्यात येतील, अशी माहिती सहायक आयुक्त मंगला मून यांनी दिली. इच्छूकांनी समाजकल्याण कार्यालयाकडे दि.28 नोव्हेंबरपूर्वी अर्ज करावा अशी समाज कल्याण विभागाकडून माहिती देण्यात आली.