कर्तव्यनिष्ठ अधिकारी तुकाराम मुंढेंच्या 12 वर्षाच्या कार्यकाळात 11 बदल्या

मुंबई, प्रजामंच,२२/११/२०१८

नाशिक माहापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली झाली असून निष्ठावान अधिकारयाची आवश्यकता आज किती शिल्लक उरली याचेच हे उदाहरण म्हणावे लागेल.2005 बॅचचे IAS अधिकारी असून 2006 मध्ये त्यांनी सोलापूरचे आयुक्त म्हणून सेवेला प्रारंभ करणारे अधिकारी तुकाराम मुंढे यांची मागील 12 वर्षात तब्बल 11 वेळा स्थानांतर झाले आहे, कायद्याचे काटेकोरपणे पालन करणे, भ्रष्टाचार, कामचुकारपणा यावर सतत मात करण्याचा कार्य करीत असतांना लोकप्रतिनिधीशी सतत संघर्ष होत असल्याचे बघायला मिळाले. यामुळे निष्ठावान अधिकारी कोणाला ही न पचल्याने मुंढे फार काळ कुठेच टिकले नाहीत.  मुंढे यांची कारकिर्द 2006-07 महापालिका आयुक्त, सोलापूर, 2007 प्रकल्प अधिकारी, धारणी(आले नाहीत), 2008 उपजिल्हाधिकारी, नांदेड,2008 सीईओ, नागपूर जिल्हा परिषद, 2009 अति. आदिवासी आयुक्त, नाशिक, 2010 के. व्ही. आय. सी. मुंबई, 2011 जिल्हाधिकारी, जालना, 2011-12 जिल्हाधिकारी, सोलापूर, 2012 विक्रीकर विभाग, सहआयुक्त, मुंबई, 2016 आयुक्त, नवी मुंबई महापालिका,2017  पिंपरी-चिंचवड परिवहन,पुणे, 2018 नाशिक महापालिका आयुक्त अशी आहे,

शिस्तप्रिय,कर्तव्यनिष्ठ व जनहितार्थ काम करणारे अधिकारी म्हणून ओळख असलेले तुकाराम मुंढे यांची बदली आता कोठे होणार याबाबत देखील अनेकांना उत्सूकता आहे. त्यांचा लोकप्रतिनिधींशी कायम संघर्ष होत आला आहे. वर्ष-दीड वर्षांपेक्षा अधिक काळ कुठेच टिकले नाहीत. अश्या परिस्थितीत प्रत्येक ठिकाणी कामाचा ठसा उमटविण्यात मागे राहिले नाही. ते जिथे जातील तिथे कर्मचाऱ्यांना शिस्त लावून गैरव्यवहार मोडून काढण्याचे काम केले,

लोकप्रतिनिधींची मनमानी बंद करत असल्याने त्याच्या सोबत सतत भांडणं झाल्याचे बघायला मिळाले.मुंढे  नाशिकमध्ये नगरसेवकांविरूद्धच्या वादात एकदा मुख्यमंत्र्यांनी मध्यस्ती केली मात्र काही महिने वगळता शांतता फार काळ राहिली नाही. आपल्या स्वभावाला मुरड घाला असं त्यांना अनेकदा सांगण्यात आलं मात्र मुंढेंनी कधीच आपला स्वभाव बदलला नाही. नेहमी साधनशुचीतेच्या गप्पा करणाऱ्या भाजपलाही मुंढे मानवले नाहीत. हरियाणात काँग्रेसचं सरकार असताना तिथले एक अधिकारी अशोक खेमका यांच्याही अशा प्रकारे बदल्या होत होत्या तेव्हा भाजपने रान उठवलं होते. काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात जेव्हा मुंढे यांची बदली होत असे तेव्हा भाजपने सरकारवर टीका केली होती.

स्वच्छ अधिकाऱ्यांना संरक्षण दिलं जातं हे जनतेला सांगण्याची संधी भाजपला होती. तुकाराम मुंढे यांच्या प्रकरणानंतर आता कुठल्याच सरकारला प्रामाणिक अधिकारी नको असतात हेच सिद्ध झालं अशी प्रतिक्रीया व्यक्त होतांना दिसते.

आपल्या चांगल्या कामासाठी मुंढे यांना अनेकदा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कारही मिळालाय. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींचे दडपण आल्यानंतर त्या त्या वेळी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या बदलीचे निर्णय घ्यावे लागले हे विशेष.