मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या पित्याने स्वत:चे लिंग छाटले

कोची,प्रजामंच,21/11/2018

स्वत:च्या पोटच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या एका आरोपी पित्याने तुरुंगातच स्वत:चे लिंग कापून टाकल्याची धक्कादायक घटना कोचीच्या पीरमाडे तुरुंगात घडली आहे. वेंदीपेरियार (42) असे त्या आरोपीचे नाव असून त्याने दाढी करायच्या ब्लेडने स्वत:चे लिंग छाटले. सध्या वेंदीपेरियारला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

वेंदीपेरियारने दारुच्या नशेत स्वत:च्या दहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला होता. याप्रकरणी काही दिवसांपूर्वी न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता. मात्र जामीनाच्या अटी पूर्ण करण्यासाठी त्याचे कुणीही नातेवाईक किंवा मित्र आले नव्हते. त्यामुळे तो निराश झाला होता. त्यात दारुच्या नशेत मुलीवरच बलात्कार केल्याची सल त्याला सतत टोचत होती. त्यामुळे नैराश्याने ग्रासलेल्या त्याने स्वत:चेच लिंग कापून टाकले, अशी माहिती तुरुगांतील पोलीस अधिकारी राजेश यांनी दिली.