वादग्रस्त शिक्षणाधिकारी नीलिमा टाके यांच्याविरुध्द विभागीय चौकशीचे आदेश,२ कर्मचाऱ्यांना ५ हजारांचा दंड

राज्यमाहीती आयुक्त संभाजी सरकुंडे यांनी दिले मुख्यकार्यपालन अधीकाऱ्यांना आदेश

माहितीच्या अधिकारात माहिती न दिल्याचा ठपका दोन कर्मचाऱ्यांना ५ हजारांचा दंड

अमरावती ,प्रजामंच,21/11/2018

विहीत मुदतीत माहिती न देता तसेच याबाबत सुनावणी न घेतल्याचा ठपका ठेवत तत्कालिन उपसंचालक चंदनसिंग राठोड व जिल्हापरीषद माध्यमिकच्या वादग्रस्त विद्यमान शिक्षणाधिकारी नीलिमा टाके-गुल्हाने यांच्या विरोधात विभागीय चौकशी व शिस्तभंगाची कारवाई राज्य माहिती आयुक्तांनी प्रस्तावित केली आहे. तसेच शिक्षणाधिकारी कार्यालयातील दोन अधीक्षकांवर प्रत्येकी ५ हजारांचा दंड ठोठावण्याचे आदेश सीईओंना देण्यात आले आहे..याप्रकरणात राज्यमाहीती आयुक्त कार्यालयाने निलिमा टाके यांचे बयान घेतले आहे.

धामणगाव रेल्वे तालुक्यातील अशोकनगर येथील रहिवासी असलेले हेमंत कडू यांनी  व  विजय सुधाकरराव झुडपे रा,परतवाडा यांनी माध्यमिक शिक्षक विभागाकडे सन २०१५ मध्ये माहिती मागितली होती. त्यावेळी चंदनसिंग राठोड हे माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी पदावर कार्यरत होते. जनमाहिती अधिकारी म्हणून अधीक्षक पदावर कार्यरत असलेले पंढरीनाथ वाणे, वीरेंद्र रोडे व भावना भोगे यांच्याकडे माहिती देण्याची जबाबदारी असताना त्यांनी माहिती न दिल्याने राज्य माहिती आयुक्तांनी तिघांना दोषी ठरविले होते. मात्र यातील वाणे हे सेवानिवृत्त झाल्याने यातील रोडे आणि भोगे यांच्या वेतनातून प्रत्येकी पाच हजाराचा दंड ठोठावण्याचे आदेश राज्य माहिती आयुक्तांनी दिले आहे.

तसचे या प्रकरणी सुनावणी न घेतल्याने तत्कालिन शिक्षणाधिकारी चंदनसिंग राठोड आणि राठोड यांच्या पदोन्नतीनंतर शिक्षणाधिकारी पदावर रूजू झालेल्या विद्यमान शिक्षणाधिकारी नीलिमा टाके यांच्यावर विभागीय व शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश राज्य माहिती आयक्तांनी सीईओंना तीन महिन्यांपूर्वी दिले होते. परंतु शिक्षण विभागातून माहिती न मिळाल्याने सीईओंनी नीलीमा टाके यांची सुनावणी घेतली. या पुर्वीच्या सुनावणीला त्यांची अनुपस्थिती असल्याने शिक्षणाधिकारी यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाई करण्याकरिता सीईओंनी पुन्हा सुनावणी ठेवली आहे.शिक्षणाधीकारी यांच्या कार्यप्रणालीच्या विरुध्द शिक्षकांत व जनतेत प्रचंड रोष आहे.याबाबत शिक्षकभारती संघाचे सुनिले तेली यांनी नुकतीच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेवुन शिक्षणाधीकारी निलीमा टाके गुल्हाने व त्यांचे पोषणआहार अधीक्षकपदापर भातकुली पंचायत समितीत कार्यरत पती सचिन गुल्हाने यांची तक्रार केली आहे.